या वेळेला देवी सरस्वती तुमच्या जिभेवर असते? या काळात जे बोलाल ते विचारपूर्वक बोला, होतील पूर्ण
देवी सरस्वती दिवसातून एकदा आपल्या जिभेवर असते असं आपण अनेकदा ऐकलं असेल. त्यावेळी आपण जे बोलू ते सर्व खरं ठरतं असं म्हटलं जातं. त्यासाठी या ठराविक वेळेत नेहमी सकारात्मकच बोलले पाहिजे असं म्हटलं जातं. पण ज्या वेळेला सरस्वती आल्या जीभेवर असते ती वेळ नक्की कोणती हे जाणून घेऊयात.

तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की, “नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात. किंवा अशी एक वेळ असते ज्यावेळी नेहमी चांगलेच बोलावे कारण यावेळी सरस्वती आपल्या जीभेवर असते. त्यावेळी अशुभ असं काहीच बोलू नये अन्यथा त्या गोष्टी खऱ्या होतात. देवी सरस्वती दिवसातून एकदा आपल्या जिभेवर असते. म्हणूनच, या काळात आपण जे बोलतो ते खरे ठरण्याची शक्यता जास्त असते. या काळात कधीही चुकीचे किंवा वाईट बोलू नयेत असं म्हटलं जातं.
देवी सरस्वती आपल्या जिभेवर असते तेव्हा…
आपण अनेकदा स्वत:शीच बोलताना देखील अनेकदा सकारात्मक बोलण्याऐवजी नकारात्मकच जास्त बोलतो. आणि जर ती हीच वेळ असेल तर त्या गोष्टी खरंच घडण्याची शक्यता असते ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कारण मान्यतेनुसार, जेव्हा देवी सरस्वती आपल्या जिभेवर असते तेव्हा आपण त्या वेळी जे काही बोलतो ते 100% बरोबर होते. पण अनेकांना ती वेळच माहित नसते.
यावेळी देवी सरस्वती आपल्या जिभेवर असते
देवी सरस्वती नक्की कधी आपल्या जीभेवर असते याबद्दल नक्कीच अनेकांना ती ठराविक आणि योग्य वेळ माहितच नाही. चला जाणून घेऊयात की ती वेळ नक्की कोणती आहे? शास्त्रांनुसार, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवी सरस्वती आपल्या जिभेवर असते. ब्रह्म मुहूर्त नेहमीच सूर्योदयाच्या दीड तास आधी सुरू होतो. हा काळ दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत असतो. या काळात योग आणि ध्यान करणे खूप फायदेशीर असते. या काळात देवी सरस्वती आपल्या जिभेवर असते. या काळात आपण काहीही बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. या काळात उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचे खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
या काळात नक्की कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजेत?
ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी आपण नेहमी सकारात्मक विचार बोलले पाहिजेत. असे केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम मिळण्याची खात्री होते. या काळात आपण इतरांबद्दल तसेच स्वत:बद्दल देखील नकारात्मक गोष्टी बोलणे टाळले पाहिजे. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे विचार आणि शब्द दोन्हीही यावेळी सकारात्मकच असले पाहिजेत याचा प्रयत्न करावा.
ही कामे ब्रह्म मुहूर्तात करावीत
ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे सगळ्यात शुभ मानले जाते. तसेच आपल्या आवडत्या देवतेचे मनापासून स्मरण करावे. जर तुम्हाला या काळात ध्यान करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. जर तुम्हाला मंत्र जपायचे असतील तर ब्रह्म मुहूर्तापेक्षा चांगला काळ नाही. जर तुम्ही हा नियमित सराव केला तर त्याचे तुमच्या आयुष्यात सकारात्मकच परिणाम घडलेलेच पाहायला मिळतील. ब्रह्म मुहूर्तावर सकारात्मक बोलण्यासोबतच या गोष्टी करणेही शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
