AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्त्रीच्या या अवयवावर पाल पडणे अत्यंत शुभ मानले जाते? ज्योतिष अन् शकुनशास्त्र काय सांगतं?

घरात पाल दिसली की सर्वांनाच भीती वाटते. पण शकुन शास्त्रानुसार पालीचे आवाज काढणे तसेच पालीचे महिलेच्या अंगावर पडणे याचे अनेक संकेत असतात. चला जाणून घेऊया की स्त्रीच्या शरीरावरील कोणत्या भागांवर पाल पडणे शुभ किंवा अशुभ मानले जाते.

स्त्रीच्या या अवयवावर पाल पडणे अत्यंत शुभ मानले जाते? ज्योतिष अन् शकुनशास्त्र काय सांगतं?
It is considered very auspicious for a lizard to fall on this part of a womanImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 04, 2025 | 4:35 PM
Share

घरात अनेकजण विशेष: महिला जर कशाला सर्वात जास्त घाबरत असतील तर ती पाल आहे. कधी किचनमध्ये, कधी बाथरुममध्ये दिसणारी पाल पाहिल्यानंतर अनेकांना प्रचंड घाबरायला होतं. कारण ती अंगावर पडण्याची भीती असते. किंवा किचनमध्ये कधी कधी जेवण झाकलेलं नसतं तेव्हा त्यात पडण्याची भीती असते. त्यामुळे पाल घरात दिसली की सगळेजण तिला हाकलवून लावतात.

पालीचे चुकचुकणे  किंवा  अंगावर पडणे शुभ कि अशुभ?

पण काहीवेळेला पालीचे चूकचूक आवाज करणे किंवा तिचे अंगावर पडणे यावरून अनेक शुभ किंवा अशुभ शकुनांसोबत संबंध जोडले जातात. ज्योतिष आणि शकुनशास्त्रात, पाल पडण्याची घटना सामान्य मानली जात नाही. उलट, ती भविष्यातील शुभ किंवा अशुभ शकुनांशी जोडली जाते.

महिलेच्या शरीराच्या काही भागांवर पाल पडण्याचे शुभ- अशुभ संकेत

विशेषतः जर एखाद्या महिलेच्या शरीराच्या काही भागांवर पाल पडली तर त्याचे अनेक अर्थ निघतात. काही ठिकाणी ते संपत्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, तर काही ठिकाणी त्याकडे अशुभ चिन्ह म्हणून पाहिले जाते. चला जाणून घेऊया की स्त्रीच्या शरीरावरील कोणत्या भागांवर पाल पडणे शुभ किंवा अशुभ मानले जाते.

महिलेच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पाल पडणे

शकुन शास्त्रानुसार, जर एखाद्या महिलेच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पाल पडली तर तो एक शुभ शकून मानले जाते. असे मानले जाते की भविष्यात महिलेला आर्थिक लाभ होण्याची आणि नातेसंबंधांमधील संघर्ष दूर होण्याचे संकेत आहेत.

एखाद्या महिलेच्या थेट डोक्यावर पाल पडणे

एखाद्या महिलेच्या थेट डोक्यावर पाल पडणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तिला भविष्यात काही वाईट बातमी मिळू शकते. शिवाय, जर एखाद्या

महिलेच्या हातावर पाल पडणे

महिलेच्या डाव्या हातावर पाल पडली तर याचा अर्थ असा होतो की तिला अनावश्यक खर्च येऊ शकतो किंवा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. स्त्रीच्या उजव्या हातावर पाल पडणे शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभाची आणि तसेच नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता दर्शवते.

महिलेच्या मानेवर पाल पडली तर

पाल महिलेच्या उजव्या पायावर पडणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की ती भविष्यात प्रवास करू शकते आणि कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. महिलेच्या डाव्या पायावर पाल पडणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की जर तुम्ही कुठे जाण्याचे नियोजन करत असाल पिकनीकचे नियोजन करत असाल तर ते पुढे ढकलावे कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

महिलेच्या गळ्यावर पाल पडणे

एखाद्या महिलेच्या गळ्यावर पाल पडणे हे कुटुंबातील शुभ घटना आणि समृद्धीचे संकेत देते.

महिलेच्या पोटावर पाल पडणे

महिलेच्या पाठीवर पाल पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ जवळच्या व्यक्तीशी मतभेद किंवा वाद होऊ शकतात. हे वाद कुटुंबात, परिसरात किंवा कामाच्या ठिकाणी होऊ शकतात, म्हणून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल. महिलेच्या पोटावर पाल पडणे हे देखील अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तिला पोटाशी संबंधित समस्या येऊ शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन