Jaya Ekadashi 2024 : आज जया एकादशी, शुभ मुहूर्त, पूजन विधी आणि उपाय

| Updated on: Feb 21, 2024 | 10:53 AM

जया एकादशीला ग्रहांना शांत करण्यासाठी पूर्व दिशेला एका फळीवर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूचा फोटो स्थापित करा. धूप दिवा लावा आणि कलश स्थापित करा. वस्त्र, फळे, फुले, सुपारी इत्यादी अर्पण करा. उजव्या हातात पाणी घ्या आणि पीडित ग्रहांना शांत करण्यासाठी प्रार्थना करा.

Jaya Ekadashi 2024 : आज जया एकादशी, शुभ मुहूर्त, पूजन विधी आणि उपाय
एकादशी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज जया एकादशी आहे. हे व्रत दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला (Akadashi) केले जाते. ज्योतिषांच्या मते या दिवशी श्रीकृष्णाची विशेष पूजा केल्याने वाईट कर्मे आणि पाप नष्ट होतात. या व्रताने संस्कारांची शुद्धी होते. जया एकादशीचे व्रत करून चंद्राचा प्रत्येक अशुभ प्रभाव टाळता येतो. ग्रहांचा अशुभ प्रभावही बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. मंगळवार, 20 फेब्रुवारीला म्हणजेच आज जया एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 2 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. जया एकादशीच्या पारणाची वेळ बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.55 ते 9:11 पर्यंत असेल.

जया एकादशीच्या पूजेची पद्धत

जया एकादशी व्रत दोन प्रकारे पाळले जाते – निर्जल व्रत आणि फळ व्रत. साधारणपणे, केवळ पूर्णपणे निरोगी व्यक्तीने निर्जल उपवास पाळावा. सामान्य लोकांनी फळे किंवा पाण्याचे व्रत पाळावे. या व्रतामध्ये भगवान श्रीकृष्णाची उपासना विशेष फलदायी ठरते. जया एकादशीला सकाळी स्नान करून व्रत करण्याचा संकल्प करावा.

त्यानंतर एका आसनावर विष्णूची मूर्ती स्थापित करा. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना फळे, फुले, मिठाई, नेवैद्य अर्पण करा. या दिवशी देवाला पंचामृतही अर्पण केले जाते.  त्यानंतर द्वादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून आणि दान देऊन उपवास सोडावा.

हे सुद्धा वाचा

ग्रहांच्या शांतीसाठी उपाय

जया एकादशीला ग्रहांना शांत करण्यासाठी पूर्व दिशेला एका फळीवर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूचा फोटो स्थापित करा. धूप दिवा लावा आणि कलश स्थापित करा. वस्त्र, फळे, फुले, सुपारी इत्यादी अर्पण करा. उजव्या हातात पाणी घ्या आणि पीडित ग्रहांना शांत करण्यासाठी प्रार्थना करा. संध्याकाळी जया एकादशीची व्रत कथा ऐकावी व फळे खावीत. शक्य असल्यास रात्री भगवान विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा.

जया एकादशीला काय करावे आणि काय करू नये

या दिवशी गरजू लोकांना मदत करण्याचा संकल्प घ्या. पींपळ आणि केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. तामसीक अन्न, वर्तन आणि विचार यापासून दूर राहा. या दिवशी, आपले मन शक्य तितके भगवान श्रीकृष्णावर केंद्रित करा. जया एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)