AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनी जयंतीच्या मुहूर्तावर 50 वर्षांनंतर येतोय केदार योग, या 4 राशींचे नशीब फळफळणार

शनी जयंतीच्या दिवशी खास केदार योग तयार होत आहे. ज्यामुळे चार राशींवर धनवर्षा होणार आहे. तुमची रास यात सामील आहे का ? जाणून घ्या....

शनी जयंतीच्या मुहूर्तावर 50 वर्षांनंतर येतोय केदार योग, या 4 राशींचे नशीब फळफळणार
Shani Jayanti 2026
| Updated on: May 07, 2026 | 7:43 PM
Share

यंदाची साल २०२६ ची शनि जयंती आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्राच्या दृष्टीने खूपच खास आहे. १६ मे रोजी ग्रहांची एक विशेष स्थिती तयार होत आहे. ज्यास ज्योतीष शास्रात केदार योग म्हटले जाते. या दुर्मिळ योग तब्बल ५० वर्षानंतर होत आहे. हा योग काही निवडक राशींसाठी नशीबाचे द्वार उघडणार आहे.

केदार योगाचे महत्व काय ?

ज्योतीष गणनेनुसार जेव्हा कुंडलीच्या सातही घरात सर्व सात ग्रह उपस्थित असतात. तेव्हाच केदार योगाचे निर्मिती होते. शनि जयंतीच्या निमित्ताने या योगाची निर्मिती सोनेपे सुहागा सारखी स्थिती असते. शनि देव, ज्यांना न्यायाची देवता मानली जाते. या योगाच्या प्रभावाने साधकांना त्यांच्या कर्माच्या अनेक पटीने फळ मिळते.

या चार राशींवर होईल धनाचा वर्षाव –

1. मेष रास (Aries)

मेष राशीवाल्यासाठी केदार योग हा करियरमध्ये मोठी झेप लावण्यासारखी संधी असते. त्यामुळे बराच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारणा होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. वडीलांच्या संपत्तीतून लाभ मिळण्याचे देखील संकेत असतील.

2. सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यापार आणि नोकरीच्या विस्ताराचा असणार आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करु इच्छीत असाल तर हा योग तुम्हाला यश मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचे कौतूक होईल, जुन्या कर्जांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

3. वृश्चिक रास (Scorpio)

शनिदेवाच्या कृपेने वृश्चित राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. या दरम्यान तुम्हाला नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. तसेच जे लोक परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाची योजना करत आहेत. त्यांचा मार्ग सोपा होईल.

4. कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. यामुळे या दुर्लभ योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव कुंभ राशीवर पडणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. अडकलेली कायदेशीर कामे तुमच्या बाजूने यश पदरात पाडतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल.

शनी जयंतीवर हे उपाय करा

केदार योगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी शनि मंदिरात राईच्या तेलाचा दिवा लावा. काळी उडीद, काळे तिळ आणि लोखंडाचे दान करणे शुभर राहिल. तसेच ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ मंत्राचा जप देखील केल्याने शनी देवाची विशेष कृपा प्राप्त होतील.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा