खरमासच्या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर

14 मार्चपासून खरमास सुरु झाला आहे आणि 14 एप्रिलपर्यंत चालेल (Vishnu Sahasranamam Mantra Chanting ). या महिन्यात मांगलिक कार्य करण्यास मनाई असते.

खरमासच्या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
Vishnu Sahastranam

मुंबई : 14 मार्चपासून खरमास सुरु झाला आहे आणि 14 एप्रिलपर्यंत चालेल (Vishnu Sahasranamam Mantra Chanting ). या महिन्यात मांगलिक कार्य करण्यास मनाई असते. पण, पूजा-अर्चनेसाठी हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. सृष्टीचे पालनहार विष्णू भगवानच्या पूजेसाठी हा महिना विशेष मानला जातो (Kharmas 2021 Vishnu Sahasranamam Mantra Chanting Importance).

त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अत्यंत लाभदायक आहे. विष्णु सहस्त्रनाम यामध्ये भगवान विष्णू यांचे एक हजार नावं देण्यात आले आहेत. जर तुमच्या जन्मपत्रिकेत बृहस्पती जर खालच्या राशीत असले किंवा खूप कमकुवत असेल तर खरमास दरम्यान विष्णू सहस्त्रनामाचं पठन नक्की करा. चला जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती –

भीष्म पितामह यांच्यकडून विष्णु सहस्त्रनामाचं वर्णन

महाभारतावेळी जेव्हा भीष्म पितामह हे बाणांच्या शैयेवर आपल्या मृत्यूच्या योग्य वेळेची प्रतिक्षा करत होते तेव्हा युधिष्ठिरने त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा प्रकट केली. युधिष्ठिरने विचारलं की असा कोण आहे जो प्रत्येक कणाकणात आहे आणि ज्याला सर्वशक्तिशाली मानलं जातं. जो आम्हाला या भवसागरमधून बाहेर काढू शकेल. याचं उत्तर देताना भीष्म पितामह यांनी त्याच्यासमोर विष्णू सहस्त्रनामाचं वर्णन केलं होतं.

विष्णू सहस्त्रनामाचं महत्व काय?

याचं महत्व सांगताना भीष्म पितामह म्हणाले की विष्णू सहस्त्रनामाचं पठन युगानुयुगे फलदायी ठरेल. जो कोणी नियमितपणे याचं पठन करेल किंवा हे ऐकेल त्याचे प्रत्येक प्रकारचे कष्ट दूर होतील. विष्णू सहस्त्रनामाचं पठन करणाऱ्यांवर दुर्भाग्य, धोका, जादूटोणा, दुर्घटना आणि वाईट नजरेचा काहीही असर होत नाही.

विष्णू सहस्त्रनामाचं पठन कसं करावं

सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करुन पिवळे कपडे परिधान करा. भगवान विष्णूला पिवळे पुष्प, चंदन, पिवळ्या अक्षता आणि धूप-दीप अर्पण करा. त्यानंतर त्यांना गुळ आणि चण्याचं नैवेद्य दाखवा. मग त्यांच्यासमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूला शिव, शंभु आणि रुद्र यांसारख्या नावांनेही ओळखलं जाते, जो हे स्पष्ट करते की शिव आणि विष्णू वास्तवमध्ये एकच आहे (Kharmas 2021 Vishnu Sahasranamam Mantra Chanting Importance).

हा मंत्रही देऊ शकतो विष्णू सहस्त्रनामाचं फळ

जर तुमच्याजवळ वेळ कमी असेल किंवा तुम्ही नियमितपणे विष्णू सहस्त्रनामाचं पठन करु शकत नसाल तर आम्ही तुम्हाला आणखी एक मंत्र सांगतोय ज्याचा तुम्ही नियमित जाप करु शकता. हा मंत्र भगवान विष्णूच्या सहस्त्र नावांचं फळ देणारा मानलं जाते –

“नमो स्तवन अनंताय सहस्त्र मूर्तये, सहस्त्रपादाक्षि शिरोरु बाहवे,
सहस्त्र नाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटि युग धारिणे नमः “

Kharmas 2021 Vishnu Sahasranamam Mantra Chanting Importance

संबंधित बातम्या :

Kharmas 2021 : खरमासात वाढेल दान-ध्यानाचं महत्त्व! ‘ही’ कामे केल्याने होईल चांगला फायदा

Omkareshwar Temple : भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रकट झाली नर्मदा नदी, श्रद्धेची अनोखी कहाणी