Benefits Of Vrat | देवी-देवतांसाठी ठेवण्यात येणाऱ्या उपवासाचं महत्व काय? कुठल्या दिवशी उपवास ठेवल्याने काय फायदा होतो?

सनातन परंपरेत सर्व देवी-देवतांसाठी पाळले जाणारे व्रत हे एक प्रकारे पवित्र यज्ञ किंवा हवनचेच दुसरे रुप आहे. यामध्ये, त्यांची आराधना करुन त्यांची उपासना किंवा कृपा प्राप्त करणे हा मुख्य उद्देश आहे. खऱ्या अर्थाने उपवास हे धर्माचे साधन मानले जाते. ज्यामध्ये भक्त सर्व नियम आणि परंपरा पाळतो आणि जप, तपस्या इत्यादीद्वारे आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करतो.

Benefits Of Vrat | देवी-देवतांसाठी ठेवण्यात येणाऱ्या उपवासाचं महत्व काय? कुठल्या दिवशी उपवास ठेवल्याने काय फायदा होतो?
Vrat benefits
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Sep 03, 2021 | 11:50 AM

मुंबई : सनातन परंपरेत सर्व देवी-देवतांसाठी पाळले जाणारे व्रत हे एक प्रकारे पवित्र यज्ञ किंवा हवनचेच दुसरे रुप आहे. यामध्ये, त्यांची आराधना करुन त्यांची उपासना किंवा कृपा प्राप्त करणे हा मुख्य उद्देश आहे. खऱ्या अर्थाने उपवास हे धर्माचे साधन मानले जाते. ज्यामध्ये भक्त सर्व नियम आणि परंपरा पाळतो आणि जप, तपस्या इत्यादीद्वारे आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करतो.

उपवासाची परंपरा जगातील जवळजवळ सर्व धर्मांमध्ये आढळते. सर्व इच्छांसाठी ठेवलेले हे उपवास मानवाच्या सर्व पापांचा नाश करतात आणि त्यांना पुण्य प्रदा करतात. उपवास हे माणसाच्या मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचे साधन आहे. आठवड्याच्या सात दिवसांच्या उपवासाने कोणत्या इच्छा पूर्ण होतात जाणून घ्या –

रविवारचा उपवास –

प्रत्यक्ष देवता सूर्यदेवासाठी ठेवण्यात येणाऱ्या या उपवासाने रोग, दुःख आणि शत्रूची भीती दूर करतो आणि आनंद आणि समृद्धी आणतो.

सोमवारचा उपवास –

चंद्र देवासाठी ठेवण्यात येणारा हा उपवास वैवाहिक जीवनात मानसिक शांती आणि आनंद आणि समृद्धी आणतो.

मंगळवारचा उपवास –

पृथ्वीपुत्र मंगळ देव यांच्यासाठी हा उपवास ठेवला जातो, याने व्यक्तीला जमीन आणि भवनचे सुख मिळते. यासोबत त्याला शत्रूंवर विजय, पुत्र सुख, वाहन सुख इत्यादींची प्राप्ती होते.

बुधवारचा उपवास –

चंद्रपुत्र बुधचे देवासाठी ठेवण्यात येणाऱ्या या उपवासाने बुद्धिमत्तेचा विकास, व्यवसायात नफा, संतान प्राप्ती आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे आशीर्वाद मिळतो.

गुरुवारचा उपवास –

देवगुरु बृहस्पतीसाठी उपवास ठेवल्याने व्यक्तीला ज्ञान, आदर आणि सौभाग्य लाभते. त्याच्या आयुष्यात कधीही अन्न-धान्याची कमतरता होत नाही.

शुक्रवारचा उपवास –

शुक्र देवासाठी उपवास केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळते आणि त्याचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते.

शनिवारचा उपवास –

सूर्यपूत्र शनिदेवासाठी उपवास केल्याने व्यक्तीला शत्रू आणि संकटांपासून संरक्षण मिळते. या उपवासाने लोखंड, यंत्र इत्यादींशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष यश मिळते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण

नोकरी गमावण्याची भीती वाटत असेल तर करा तुळशीचा हा उपाय, प्रमोशनही मिळेल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें