
आपल्या सनातन धर्मात कोणत्याही कार्याची सुरूवात ही शुभ दिवस आणि अनुकूल काळ पाहून केला जातो. नवीन वर्षात प्रत्येकजण कोणत्याही विशेष कार्याची सुरुवात शुभ दिवशी तसेच एखाद्या प्रमुख सणांच औचित्य साधून करतात. तर 2026 चे नवीन वर्ष सुरू झाले आहे. दरवर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात सण उत्सव सारखेच राहतात. फक्त येणाऱ्या नवीन वर्षात त्यांच्या तारखा थोड्याशा बदलतात. तर 2026 मध्ये कोणते उपवास आणि सण कोणत्या तारखेला येतील ते जाणून घेऊयात.
जानेवारी 2026 व्रत आणि सणांच्या तारखा…
01 जानेवारी 2026: इंग्रजी नववर्षाची सुरुवात, गुरु प्रदोष व्रत
03 जानेवारी 2026: पौष पौर्णिमा, शाकंभरी जयंती
03 जानेवारी 2026: माघ महिन्याची सुरूवात
05 जानेवारी 2026: गुरु गोविंद सिंग यांची जयंती
06 जानेवारी 2026: संकष्टी चतुर्थी
12 जानेवारी 2026: स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन
13 जानेवारी 2026: लोहरी
14 जानेवारी 2026: मकर संक्रांती, षट्तिला एकादशी, पोंगल, उत्तरायण
16 जानेवारी 2026: शुक्रवार प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री, शब-ए-मेराज
18 जानेवारी 2026: मौनी अमावस्या, माघ अमावस्या
19 जानेवारी 2026: माघ नवरात्री
20 जानेवारी 2026: चंद्र दर्शन
22 जानेवारी 2026: गणेश जयंती, विनायक गणेश चतुर्थी, रामलाला प्रतिष्ठा दिन
23 जानेवारी 2026: वसंत पंचमी, सरस्वती जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
24 जानेवारी 2026: स्कंद षष्ठी
25 जानेवारी 2026: भानु सप्तमी, रथ सप्तमी, नर्मदा जयंती
26 जानेवारी 2026: प्रजासत्ताक दिन, दुर्गाष्टमी
29 जानेवारी 2026: जया एकादशी व्रत, भीष्म द्वादशी
30 जानेवारी 2026: जया एकादशी, गांधीजींची पुण्यतिथी आणि शुक्र प्रदोष
जानेवारीमध्ये मकर संक्रांती, षट्तिला एकादशी, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि गुरु गोविंद सिंग जयंती असे पाच प्रमुख सण असतील.
फेब्रुवारी महिना 2026 सण
1 फेब्रुवारी 2026: माघ पौर्णिमा, माघ स्नान समाप्त, संत रोहिदास जयंती
5 फेब्रुवारी 2026: संकष्टी चतुर्थी
9 फेब्रुवारी 2026: कालाष्टमी, जानकी जयंती
11 फेब्रुवारी 2026: श्री रामदास नवमी
12 फेब्रुवारी 2026: स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती
13 फेब्रुवारी 2026: विजया एकादशी, कुंभ संक्रांती
14 फेब्रुवारी 2026: शनी प्रदोष व्रत (कृष्ण)
15 फेब्रुवारी 2026: महाशिवरात्री
17 फेब्रुवारी 2026: स्नान, दान आणि श्राद्धासाठी सोमवती अमावस्या
19 फेब्रुवारी 2026: छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रमजान उपवास प्रारंभ,
24 फेब्रुवारी 2026: दुर्गाअष्टमी
27 फेब्रुवारी 2026: आमलकी एकादशी
28 फेब्रुवारी 2026: प्रदोष व्रत
मार्च 2026 व्रत आणि उत्सव
1 मार्च 2026: रवि प्रदोष व्रत
03 मार्च 2026: होळी
04 मार्च 2026: धुळिवंदन
06 मार्च 2026: संकष्टी चतुर्थी
08 मार्च 2026: रंगपंचमी, जागतिक महिला दिन
10 मार्च 2026: सावित्रीबाई फुले पुण्यदिन
11 मार्च 2026: कालाष्टमी, छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन
15 मार्च 2026: पापमोचनी एकादशी, मीन संक्रांती
16 मार्च 2026: सोम प्रदोष व्रत (कृष्ण)
17 मार्च 2026: मासशिवरात्री
18 मार्च 2026: दर्श अमावस्या
19 मार्च 2026: गुढी पाडवा चैत्र नवरात्री
20 मार्च 2026: चंद्र दर्शन, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन
21 मार्च 2026: रमजान ईद
26 मार्च 2026: राम नवमी
27 मार्च 2026: चैत्र नवरात्री समाप्ती
29 मार्च 2026: कामदा एकादशी
30 मार्च 2026: सोम प्रदोष व्रत
31 मार्च 2026: महावीर जयंती
एप्रिल 2026 सण
2 एप्रिल 2026: हनुमान जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमा
3 एप्रिल 2026: गुड फ्रायडे
5 एप्रिल 2026: संकष्टी चतुर्थी, इस्टर संडे
07 एप्रिल 2026: जागतिक आरोग्य दिन
13 एप्रिल 2026: वरुथिनी एकादशी, श्री वल्लभाचार्य जयंती
14 एप्रिल 2026: भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर जयंती
15 एप्रिल 2026: मासिक शिवरात्री, प्रदोष व्रत (कृष्ण)
19 एप्रिल 2026: अक्षय्य तृतीया, श्री परशुराम जयंती
21 एप्रिल 2026: आदि शंकराचार्य यांची जयंती
23 एप्रिल 2026: गंगा सप्तमी, गुरूपुष्यामृतयोग
27 एप्रिल 2026: मोहिनी एकादशी
30 एप्रिल 2026: नरसिंह जयंती
मे 2026 उत्सव
1 मे 2026: महाराष्ट्र दिन, वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, कूर्म जयंती
5 मे 2026: अंगारक संकष्टी चतुर्थी
10 मे 2026: मातृदिन
13 मे 2026: अपरा एकादशी
14 मे 2026: प्रदोष व्रत (कृष्ण)
20 मे 2026: विनायक चतुर्थी
27 मे 2026: कमला एकादशी, बकरीद
जून 2026 सण
03 जून 2026: संकष्टी चतुर्थी
05 जून 2026: जागतिक पर्यावरण दिन
11 जून 2026: पद्मा एकादशी
15 जून 2026: सोमवती अमावस्या, अधिक मास समाप्ती
21 जून 2026: योग दिन, पितृदिन
25 जून 2026: निर्जला एकादशी
27 जून 2026: प्रदोष व्रत (शुक्ल), मोहरम
29 जून 2026: वटपौर्णिमा, कबीर जयंती
जुलै 2026 सण उत्सव
03 जुलै 2026: संकष्टी चतुर्थी
10 जुलै 2026: योगिनी स्मार्त एकादशी
11 जुलै 2026: भागवत एकादशी
17 जुलै 2026: विनायक गणेश चतुर्थी
25 जुलै 2026: देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी, चातुर्मास सुरू
29 जुलै 2026: गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा
ऑगस्ट 2026 सण उत्सव
1 ऑगस्ट 2026: लोकमान्य गंगाधर टिळक पुण्यतिथी
2 ऑगस्ट 2026: संकष्टी चतुर्थी
9 ऑगस्ट 2026: कामिका एकादशी
10 ऑगस्ट 2026: सोम प्रदोष व्रत (कृष्ण)
15 ऑगस्ट 2026: स्वातंत्र्य दिन , पारशी नुतनवर्ष
17 ऑगस्ट 2026: नागपंचमी
23 ऑगस्ट 2026: पुत्रदा एकादशी
26 ऑगस्ट 2026 : ईद-ए-मिलाद
27 ऑगस्ट 2026: नारळी पौर्णिमा
28 ऑगस्ट 2026: रक्षाबंधन
31 ऑगस्ट 2026: संकष्टी चतुर्थी
सप्टेंबर 2026 व्रत आणि सण
4 सप्टेंबर 2026: श्रीकृष्ण जन्माष्टमी
05 सप्टेंबर 2026: गोपाळकाला, शिक्षक दिन
7 सप्टेंबर 2026: अजा एकादशी
10 सप्टेंबर 2026: पिठोरी अमावस्या, पोळा
14 सप्टेंबर 2026: गणेश चतुर्थी, हरतालिका तृतीया
15 सप्टेंबर 2026: ऋषी पंचमी
17 सप्टेंबर 2026: ज्येष्ठ गौरी आवाहन
18 सप्टेंबर 2026: ज्येष्ठ गौरी पूजन
22 सप्टेंबर 2026: परिवर्तनिनी एकादशी
25 सप्टेंबर 2026: अनंत चतुर्दशी
26 सप्टेंबर 2026: भाद्रपद पौर्णिमा
29 सप्टेंबर 2026: अंगारक संकष्टी चतुर्थी
ऑक्टोबर 2026 सण
2 ऑक्टोबर 2026: महात्मा गांधी जयंती
6 ऑक्टोबर 2026: इंदिरा एकादशी
11 ऑक्टोबर 2026: शारदीय नवरात्री, घटस्थापना
14 ऑक्टोबर 2026: विनायक गणेश चतुर्थी
20 ऑक्टोबर 2026: दसरा
22 ऑक्टोबर 2026: पाशंकुश एकादशी
25 ऑक्टोबर 2026: शरद कोजागरी पौर्णिमा,
26 ऑक्टोबर 2026: अश्विन पौर्णिमा व्रत, वाल्मिकी जयंती, महर्षि पराशर जयंती
29 ऑक्टोबर 2026: संकष्टी चतुर्थी
नोव्हेंबर 2026 सण
5 नोव्हेंबर 2026: रमा एकादशी, वसुबारस
6 नोव्हेंबर 2026: धनतेरस, धन्वंतरी जयंती
8 नोव्हेंबर 2026: दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पुजन
9 नोव्हेंबर 2026: कार्तिक अमावस्या, सोमवती अमावस्या
10 नोव्हेंबर 2026: बलिप्रतीपदा, दीपावली पाडवा
11 नोव्हेंबर 2026: भाऊबीज
13 नोव्हेंबर 2026: विनायक चतुर्थी
21 नोव्हेंबर 2026: भागवत एकादशी
23 नोव्हेंबर 2026: वैकुंठ चतुर्दशी
24 नोव्हेंबर 2026: त्रिपुरारी पौर्णिमा, गुरु नानक जयंती
27 नोव्हेंबर 2026: संकष्टी चतुर्थी
डिसेंबर 2026 उत्सव
01 डिसेंबर 2026: काळभैरव जयंती
04 डिसेंबर 2026: उत्पति एकादशी
13 डिसेंबर 2026: विनायक चतुर्थी
20 डिसेंबर 2026: मोक्षदा एकादशी, गीता जयंती
23 डिसेंबर 2026: श्रीदत्त जयंती
२५ डिसेंबर २०२६: नाताळ
26 डिसेंबर 2026: संकष्टी चतुर्थी
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)