Vastu tips : घरात सुख- शांती नांदावी असे वाटत असेल तर घरातील भिंती रंगवा “या” रंगांनी…!

अनेकदा अनेकजण आपल्या घरातील खोल्यांना वास्तुशास्त्रानुसार रंगवत नाहीत, या चुकीमुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो.आज आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, घरातील बेडरूम, किचन आणि इतर जागेवर कोणत्या प्रकारचा रंग दिला गेला पाहिजे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

Vastu tips : घरात सुख- शांती नांदावी असे वाटत असेल तर घरातील भिंती रंगवा या रंगांनी...!
house
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:39 PM

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटते की आपले जीवन हे सुख आणि समृद्धीचे भरलेले असावे यासाठी प्रत्येक जण भरपूर मेहनत करत असतो आणि जिवाचे रान करून पैसा कमवत असतो याव्यतिरिक्त आपल्या जीवनाला एक गोष्ट प्रभावित करत असते ती म्हणजे आपली वास्तूदोष. जर काही वस्तूला आपण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार व्यवस्थित ठेवले नाही तर त्या वस्तूंचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होताना दिसतो. अनेकदा वास्तुशास्त्रामध्ये हे अशुभ मानले जाते. तसे पाहायला गेले तर वास्तुशास्त्रानुसार वस्तूंची आदला बदली करणे किंवा वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जर आपल्या घरामध्ये एखादा वास्तुदोष असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि आपल्या जीवनामध्ये कळत नकळत अनेक समस्या उद्भवत असतात. आपल्या घरात कोणती वस्तू कोठे ठेवायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेली आहे.जर आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीचे पालन केले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते व आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते.

आजच्या लेखामध्ये आपण वास्तुशास्त्र बद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की आपले घर आणि घरातील ज्या भिंती असतात त्यांना कोणत्या प्रकारचा रंग लावला पाहिजे आणि त्या रंगामागील नेमके कारण काय आहे?. हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. या प्रत्येक रंगाचा आपल्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परिणाम होत असतो. जर आपण आपल्या घरातील भिंतींना योग्य तो रंग दिला नाही तर अशा वेळी अनेक आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि आपल्या जीवनामध्ये अचानक संकटे येऊ लागतात. आपल्यापैकी अनेकजण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले नियमाचे पालन करत नाही आणि म्हणूनच अनेकांना नको ते भोग सुद्धा भोगावे लागतात. आज आम्ही तुम्हाला बेडरूम, किचन आणि आपल्या घरातील अन्य जागांवर कोण कोणत्या प्रकारचा रंग लावला गेला पाहिजे याच्या बद्दल सांगणार आहोत.

घरातील भिंतींना लावा “हा” रंग…

हॉल : वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील हॉलमध्ये पिवळा किंवा पांढरा रंग अशुभ मानला जातो यामुळे आपला हॉल सुंदर दिसतो पण त्याचबरोबर हॉलमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करते.

बाथरूम : पांढरा किंवा गुलाबी रंग लावणे हे या जागेच्या दृष्टिकोनातून शुभ मानले जाते. हे दोन्ही रंग या वास्तूशी निगडित असणारे आहेत. बाथरूममध्ये आपण आपल्या महत्वाच्या विधी पार पाडत असतो आणि म्हणूनच अशा वेळी जर भिंतींना योग्य रंग लावल्यास त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा आपल्या जीवनावर जाणवतो. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जर आपल्या घरातील सदस्यांना सुख,समाधान,वैभव, शांती लाभावी असे जर वाटत असेल तर आपले घर योग्य दिशा मध्ये असणे गरजेचे आहे तसेच वास्तूचे महत्त्व सुद्धा तितकेच गरजेचे आहे.

घरातील देवघर: देवघर हे आपल्या घरातील अत्यंत पवित्र स्थान मानले जाते आणि म्हणूनच या ठिकाणी अशा प्रकारचा रंग दिला गेला पाहिजे जेणेकरून आपले मन एकाग्र व शांत राहील. आपले चित्त शांत व प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घरातील देवघर असलेल्या जागेवर नेहमी पांढरा आणि पिवळा रंग भिंतींना लावायला हवा असे केल्याने आपले मन आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा शांत राहते आणि आपल्याला प्रत्येक कार्यांमध्ये यश प्राप्त होते.

किचन : आपल्या घरातील किचन हे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. किचन म्हणजे साक्षात अन्नपूर्णा यांचे स्थान असते आणि अशा वेळी या जागेचे महत्त्व अनन्य आहे. किचनमध्ये तसे पाहायला गेले तर पांढरा रंग लावणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु किचन मध्ये जास्त प्रमाणात कार्य पार पडत असल्यामुळे पांढरा रंग लवकर खराब होऊन जातो आणि म्हणूनच अशावेळी पांढरा रंग लवकर खराब होऊ नये म्हणून तुम्ही या ठिकाणी लाल किंवा नारंगी रंग सुद्धा मारू शकतात.

बेडरूम : बेडरूम हे आपल्या वास्तुमधील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते, या ठिकाणी सुद्धा अश्या प्रकारचा रंग असणे गरजेचे आहे जे आपल्या मनाला शांती देईल तसेच येणारा प्रत्येक दिवस आपला सकारात्मक राहील. या अनुषंगाने सुद्धा आपल्या बेडरूम मधील रंग लावणे गरजेचे असते. बेडरूम मध्ये नेहमी हलके(लाईट) रंग लावणे गरजेचे असते जेणेकरून तुमच्या बेडरूम मधील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा वास करू शकेल.

मुलांची खोली : मुलांची खोली ही वास्तुमधील अशी खोली असते की जिथे लहान मुले जास्तीत जास्त खेळत , बागळत असतात आणि म्हणूनच चोवीस तासांपैकी जास्त काळ अनेक लहान मुले या खोलीमध्ये अभ्यास करत असतात ,मस्ती करत असतात, चित्रपट पाहत असतात आणि म्हणूनच अशा वेळी या मुलांच्या खोलीमध्ये कधीच चुकून सुद्धा डार्क रंग मारू नका. तुम्हाला हवे असल्यास लहान मुलांच्या खोलीमध्ये गुलाबी रंग लावू शकता तसेच अन्य कोणतेही रंग लावू शकता परंतु ते रंग डार्क नसावे,हे रंग लाईट असतील तर मुलांना प्रसन्न सुद्धा वाटेल व त्यांचे मन त्या खोलीमध्ये नांदेल.

इतर बातम्या

कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहात ? मग हे सात उपाय करुन पाहा, कर्जमुक्त झालात म्हणून समजा!

Shani Dev | शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल का अर्पण करतात, या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का ?

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.