AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागा भट्ट यांचे वंशज करणार अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील हा सोहळा न भूतो न भविष्यति असा राहाणार असल्याचे बोलले जात आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेची मुख्य जबाबदारी वाराणसीतील 86 वर्षीय वैदिक विद्वान पं लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित (Lakshmikant Dixit) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सर्व पुरोहिताचे प्रतिनिधीत्व करतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागा भट्ट यांचे वंशज करणार अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा
पंडित लक्ष्मीकांत दीक्षीतImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 08, 2023 | 8:29 AM
Share

अयोध्या :    22 जानेवारी  2024 ला राम नगरी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा नेत्रदिपक सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहतील. हा सोहळा न भूतो न भविष्यति असा राहाणार असल्याचे बोलले जात आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेची मुख्य जबाबदारी वाराणसीतील 86 वर्षीय वैदिक विद्वान पं लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित (Lakshmikant Dixit) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सर्व पुरोहिताचे प्रतिनिधीत्व करतील. येथे आवर्जून सांगण्यासारखी गोषअट म्हणजे पं. दिक्षीत यांच्या पिढीचा इतिहास आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा 1674 मध्ये राज्याभिषेक झाला होता. काशीचे गागा भट्ट यांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी शिवरायांचा अभिषेक केला होता. लक्ष्मीकांत दीक्षित हे गागा भट्ट यांचे वंशज आहेत.

आमची मुळे महाराष्ट्रातील सोलापूरजवळील जेऊर गावात आहेत. आमचे पूर्वज काशीला गेले आणि त्यांनी आपले जीवन हिंदू परंपरा आणि विधींच्या अभ्यासासाठी समर्पित केले,” असे मथुरानाथ दीक्षित म्हणाले.

16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरू होत आहे

22 जानेवारी रोजी दुपारी 12:00 ते 12:45 या वेळेत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून रामभक्तांना रामलालांचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगितले. 22 जानेवारीला होणारा कार्यक्रम हा मुख्य कार्यक्रम असेल, त्यापूर्वी 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधानांच्या पूजेनंतरच निमंत्रित पाहुण्यांना रामललाचे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मालकांनाही आमंत्रित केले जाईल

ते म्हणाले की, मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी रामजन्मभूमी संकुलात 3 तासांपेक्षा जास्त वेळ बसावे लागेल. त्यामुळे वयस्कर पाहुण्यांनी प्राणप्रतिष्ठेनंतरच दर्शनासाठी यावे असो संस्थानाच्या आयोजकांनी म्हंटले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मृत कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रे पाठवली जातील. एवढेच नाही तर 100 हून अधिक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मालकांनाही प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?