
सध्या प्रयागराजमध्ये भव्य आणि महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात अनेक साध्वी आणि बाबांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे, त्यापैकीच एक म्हणजे IIT बाबा. यावेळी IIT बाबा कुठल्याही गोष्टीचे कारण बनलेले नसताना देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत, ज्यात ते वेगवेगळ्या विषयांवर बोलताना दिसत आहे. नुकताच IIT बाबाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते लहान मुलांप्रमाणे रडताना दिसत आहे.
अभय सिंग उर्फ आयआयटी बाबा एका व्हिडिओमध्ये रडताना दिसत आहे. सोशल मीडियावर अभय सिंग हे IIT बाबा म्हणून चर्चेत असल्याने त्यांना आयआयटी बाबाचा टॅग आवडत नसल्याचे यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर आपल्याला लोकप्रियता नको असल्याचेही ते या व्हिडीओमधून सांगताना दिसत आहे. अभय सिंह यांना त्यांचे सुरु असलेले साधे सरळ जीवन जिथे त्यांना कोणीही ओळखत नव्हते असे आयुष्य जगायचे आहे. व्हिडिओमध्ये अभय सिंग सांगताना दिसत आहे की, आता IIT बाबा बोलणे थांबले पाहिजे. पुढे म्हणाले कि मी आज जी काही मोह माया सोडून आलेलो आहे, तर पुन्हा आज IIT बाबाच्या प्रसिद्धीने लोक माझ्याकडे येत आहेत.
तर यावेळी अभय सिंग यांनी सांगितले की, ते प्रसिद्ध होण्याआधीच प्रयागराजमध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्र होते ते प्रयागराजमध्ये कुठेही बसून गप्पा मारायचे. मात्र आता प्रसिद्धीनंतर त्यांच्यासाठी हे सर्व अवघड झाले असल्याचे त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर या व्हिडीओमध्ये त्यांनी हेही सांगितले की ‘तुम्ही मला कितीही शिव्या दिल्या तरी मला त्याची पर्वा नाही. पण जेव्हा कोणी माझ्या हेतूवर प्रश्न चिन्ह उपस्थित करते तेव्हा त्रास होतो. मी काहीच नाहीए. मला फक्त माझं आयुष्य जगायचं आहे.
व्हिडीओमध्ये बोलताना अभय सिंग हे त्याच्या बहीणबद्दल आणि मित्रांबद्दल बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाले. तर पुढे अभय म्हणाले की,कौटुंबिक काही गोष्टी लक्षात आल्यावर एखादी वागणूक लक्षात आल्यावर देखील मी असाच रडायचो. जेव्हा माझी कोणतीही ओळख नव्हती. मला कोणतीही प्रसिद्धी मिळाली नव्हती तेव्हा सुद्धा मला काही गोष्टींनी अश्रू अनावर व्हायचे.