
प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरु आहे. महाकुंभादरम्यान पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केले जाते. या भव्य दिव्य सोहळ्याला विविध देशातून अनेक लेकं सहभागी झालेली पाहायला मिळाली. या सोहळ्यादरम्यान अनेक लोकं एकत्र आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु तुम्हाला माहिती आहे का महाकुंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे नागा साधू मानले जातात. सर्व भक्तांना नागा साधूंना पाहाण्याची इच्छा असते. त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या रहस्यमय राहिणीमानाबद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता असते. अनेकजण नागा साधूंच्या केसांमुळे देखील आकर्षित होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? नागा साधू कधीच केस कापत नाही. परंतु या नागचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया.
शास्त्रानुसार, केस न कापणे, सांसारिक बंधन, इच्छा आणि भौतिक सुखाचा त्याग करणे हे संन्यास घेण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. केस न कापणे हा नागा साधूंच्या तपश्चर्या आणि ध्यानाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. नागा साधूंना महादेवाचे कट्ट्र भक्त मानले जाते. नागा साधू महादेवाची कथोर पूजा आणि तपश्चर्या करतात. महादेवाला लाब सडक असा जटा आहेत. मान्यतेनुसार त्यांच्या जटांमध्ये गंगा देवी वास करते. नागा साधूंनी त्यांचे आयुष्य संपूर्णपणे महादेवाला समर्पित केले आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी नागा साधू कधीच केस कापत नाही आणि केस वाढवण्यास पसंती देतात.
नागा साधूंच्या जटा त्यांच्या शिवभक्तीचे आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेचे प्रतिक मानले जाते. नागा साधूंच्या मते, केस कापल्यामुळे महादेव नाराज होतात. त्यासोबतच कोणत्याही नागा साधूने चुकूनही केस कापले तर त्यांच्यावर महादेव नाराज होतात आणि त्यांची साधना अपूर्ण राहाते. नागा साधूंनी केस कापल्यावर तपश्चर्या केली तर त्यांना त्याचे फळ मिळत नाही आणि त्यांना महादेवाचे आशिर्वाद प्राप्त होत नाही आणि त्यांनी केलेल्या तपश्चर्याचे फळ त्यांना मिळत नाही. त्यामुळे ज्या लोकांना प्रश्न होते की नागा साधू कधिच केस का कापत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे महादेवांचा त्यांच्यावर आशिर्वाद राहणार नाही अशी मान्यता आहे. नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप लांब आणि अडचणींनी भरलेली आहे. नागा साधू होण्यासाठी 12 वर्षे लागतात. नागा साधू होण्यासाठी तीन टप्पे पार करावे लागतात. पहिल्या टप्प्यात नागा साधू बनणाऱ्याला महापुरुष, दुसऱ्या टप्प्यात अवधूत आणि तिसऱ्या टप्प्यात दिगंबर मानले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नागा साधू बनते तेव्हा त्याचे केस पहिल्यांदाच कापले जातात. यानंतर तो आयुष्यभर केस कापत नाही.
नागा साधूंचे चार प्रकार आहेत. राजेश्वर नागा, रक्ताळलेला नागा, बर्फानी नागा आणि खिचडी नागा. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात दीक्षा घेतलेल्या नागांना राजेश्वर नागा साधू म्हणतात. राजेश्वर नागा साधूंना त्यागानंतर राजयोग प्राप्त करण्याची इच्छा असते. उज्जैन कुंभात दीक्षा घेतलेल्या नागा साधूंना खूनी नाग म्हणतात. हे नागा लोक खूप आक्रमक स्वभावाचे आहेत.हरिद्वारमध्ये दीक्षा घेतलेल्या नागांना बर्फानी नागा साधू म्हणतात. या नागांचा स्वभाव खूप शांत आहे. नाशिक कुंभात दीक्षा घेतलेल्या नागांना खिचडी नागा साधू म्हणतात.