MahaShivratri 2023: आर्थिक तंगीने असाल त्रस्त, तर महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे उपाय

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Jan 26, 2023 | 11:55 PM

असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती बिल्वाच्या पानांसह भगवान शंकराची पूजा करतो आणि रात्री जागृत होऊन देवाच्या मंत्रांचा जप करतो, त्याला भगवान शिव आनंद आणि मोक्ष प्रदान करतात.

MahaShivratri 2023: आर्थिक तंगीने असाल त्रस्त, तर महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे उपाय
शिवलिंग
Image Credit source: Social Media

मुंबई, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा भगवान शिव भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा सण आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली असे मानले जाते. शिवरात्रीचे वर्णन गरुड पुराण, स्कंद पुराण, पद्मपुराण आणि अग्निपुराण इत्यादींमध्ये आढळते. असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती बिल्वाच्या पानांसह भगवान शंकराची पूजा करतो आणि रात्री जागृत होऊन देवाच्या मंत्रांचा जप करतो, त्याला भगवान शिव आनंद आणि मोक्ष प्रदान करतात.

शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने शिवभक्तीच्या शक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर या महाशिवरात्रीला काही ज्योतिषीय उपाय करून तुम्ही या अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकता. जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या

पूजेचा शुभ मुहूर्त आणि आर्थिक संकट दूर करण्याचे ज्योतिषीय उपाय-

महाशिवरात्री पूजा शुभ मुहूर्त २०२३

हे सुद्धा वाचा

  • हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा सण 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी साजरा केला जाईल.
  • निशिता काल पूजा: 19 फेब्रुवारीला सकाळी 12:16 ते 1:06 पर्यंत असेल.
  • निशिता काल पूजेचा कालावधी ५० मिनिटांचा असेल.
  • महाशिवरात्री पारण मुहूर्त: 19 फेब्रुवारी, रविवार सकाळी 06:57 ते दुपारी 03:33 पर्यंत
  • रात्री प्रथम प्रहार पूजा वेळ: संध्याकाळी 06:30 ते रात्री 09:35
  • रात्री दुसरी प्रहार पूजा वेळ: 09:35 AM ते 12:39 AM
  • रात्री तृतीया प्रहार पूजा वेळ: 19 फेब्रुवारी, रविवार, सकाळी 12:39 ते 03:43 पर्यंत
  • रात्री चतुर्थ प्रहार पूजा वेळ: 19 फेब्रुवारी, रविवार, पहाटे 3:43 ते 06:47 पर्यंत

आर्थिक संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला करा हे उपाय

  1. नोकरी किंवा व्यवसायात अडचण असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शिवलिंगावर मध मिसळून अभिषेक करावा. तसेच डाळिंबाचे फूल अर्पण करावे.
  2. ओम नमः शिवाय आणि ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करताना महाशिवरात्रीला चांदीच्या भांड्यातून जलधारेने भगवान शिवाला अभिषेक केल्यास आर्थिक प्रगती होईल. महाशिवरात्रीला गरजूंना मदत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात.
  3. महाशिवरात्रीच्या दिवशी दह्याने भगवान भोलेनाथांचा रुद्राभिषेक केल्याने धनाची वृद्धी होते.
  4. भगवान भोलेनाथांना उसाच्या रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते.
  5. धनप्राप्तीसाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करणेही शुभ मानले जाते.
  6. जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI