Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला पूजा करताना या मंत्रांचा करा जप, पूर्ण होईल मनोकामना!

Mahashivratri 2025 Mantra : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला फार महत्त्व आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्याचं म्हटंल जातं. महाशिवरात्रीला कोणत्या मंत्राचा जप करावा? जाणून घ्या.

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला पूजा करताना या मंत्रांचा करा जप, पूर्ण होईल मनोकामना!
MahaShivratri 2025
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 12:12 PM

महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहे. भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पावर्तीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते, असं म्हटलं जातं. दर वर्षी फाल्गून महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शंकर आणि माता पावर्ती याचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिव-पार्वतीची पालखी काढण्यात येते.

महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते. तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो. तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदतं. या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरतं, हे जाणून घेऊयात. तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मूहर्ताबाबत जाणून घेऊयात.

महाशिवरात्री पूजा मुहूर्त

पंचागानुसार, फाल्गुनमधील कृ्षण पक्षातील चतुर्दशी तिथीला 26 फेब्रुवारी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी सुरुवात होईल. तर चतुर्दशी समापन 27 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी होईल. तर महाशिवरात्रीचा व्रत 27 फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल. सकाळी 6 वाजून 59 मिनिटं ते सकाळी 8 वाजून 54 मिनिटं ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल.

दरम्यान महादेवाची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्राचा जप करावा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहेत. मात्र पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवा? हे आपण जाणून घेऊयात.

महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा?

  1. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भवं भवानीसहितं नमामि।।
  2. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
  3. ॐ महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नः शिवः प्रचोदयात्॥
  4. ॐ पार्वतीपतये नमः
  5. ॐ नमः शिवाय

(Disclaimer: वरील माहिती धार्मिक आणि सामन्य माहितीवर आधारित आहे. याबाबत टीव्ही9 मराठी याबाबत पुष्टी करत नाही.)