AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahatma Gandhi Quote : महात्मा गांधी यांची आज 76 वी पुण्यतिथी, आपल्या प्रियजनांना पाठवा गांधीजींचे अमुल्य विचार

Mahatma Gandhi Quote देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी यांची महत्त्वाची भूमिका होती. महात्मा गांधी यांनी कायमच सत्य आणि अहिंसेचा प्रचार केला. त्यांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांच्या अमुल्य विचारांवर प्रकाश टाकूया.

Mahatma Gandhi Quote : महात्मा गांधी यांची आज 76 वी पुण्यतिथी, आपल्या प्रियजनांना पाठवा गांधीजींचे अमुल्य विचार
महात्मा गांधीImage Credit source: social Media
| Updated on: Jan 30, 2024 | 11:07 AM
Share

मुंबई : 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजींच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस त्यांच्या आदर्शांच्या स्मरणाचा दिवस आहे ज्यामुळे त्यांनी शस्त्र न उचलता इंग्रजांना भारतातून हाकलून दिले. त्यांचे विचार हे त्याची तलवार आणि ढाल दोन्ही होते. महात्मा गांधींची जीवनकथा, सत्याचा संदेश, अहिंसा आणि प्रेमाने देशातीलच नव्हे तर परदेशातही अनेकांना प्रेरणा दिली. शहीद दिन आपल्याला महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देतो. त्यांचे विचार आजही राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतात, म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही त्यांचे हे अनमोल विचार तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.

महात्मा गांधी यांचे अमुल्य विचार

  • आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे. – महात्मा गांधी
  • अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे. – महात्मा गांधी
  • आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. –महात्मा गांधी
  • इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. – महात्मा गांधी
  • एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.– महात्मा गांधी
  • तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.– महात्मा गांधी
  • कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.– महात्मा गांधी
  • कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.– महात्मा गांधी
  • खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. – महात्मा गांधी
  • चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. – महात्मा गांधी
  • जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. – महात्मा गांधी
  • ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. – महात्मा गांधी
  • धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.– महात्मा गांधी
  • प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.– महात्मा गांधी
  • प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.– महात्मा गांधी
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.