AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makar Sankranti 2024 : भारतासह या देशातही साजरी केली जाते मकर संक्रांत? या नावाने ओळखला जातो सण

यंदा उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांती हा सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, देशातील विविध राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचेही खूप महत्त्व आहे.

Makar Sankranti 2024 : भारतासह या देशातही साजरी केली जाते मकर संक्रांत? या नावाने ओळखला जातो सण
मकर संक्रांतीImage Credit source: social Media
| Updated on: Jan 14, 2024 | 2:23 PM
Share

मुंबई : यंदा उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांती (Makar Sankranti) हा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, देशातील विविध राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचेही खूप महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. लोकं दूरदूरवरून गंगा स्ननासाठी प्रयागराजला येतात. पण उत्तरायण हा सण भारतातच नाही तर परदेशातही साजरा केला जातो. होय, हे ऐकल्यानंतर तुम्हालाही थोडे आश्चर्य वाटेल. पण देशाच्या शेजारील देशांमध्ये साजरा होणारा हा सण भारतात नव्या ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. चला जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण कोणत्या देशात साजरा केला जातो.

भारतासह या देशातही साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण

श्रीलंका

श्रीलंका भारताच्या दक्षिणेला आहे पण मकर संक्रांती इथेही साजरी केली जाते. येथे हा सण साजरा करण्यासाठी एक वेगळी परंपरा पाळली जाते. श्रीलंकेत मकर संक्रांतीला उजहावर थिरानाल म्हणून ओळखले जाते. इथले काही लोक याला पोंगल असेही म्हणतात. याचे कारण येथे तामिळनाडूचे लोक मोठ्या संख्येने राहतात.

म्यानमार

म्यानमारमध्ये हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. येथे थिनाग्यान या नावाने साजरा केला जातो. म्यानमारमधील मकर संक्रांतीचा सण बौद्ध समाजाशी संबंधित आहे. हा उत्सव 3 ते 4 दिवस चालतो. नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे मकर संक्रांतही साजरा केली जाते.

थायलंड

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की थायलंडमध्येही मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हे थायलंडमध्ये सॉन्गकर्न म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळी थायलंडमधील प्रत्येक राजाकडे स्वतःचा खास पतंग होता. देशात समृद्धीच्या आशेने भिक्षू आणि पुजारी थंडीत हा पतंग उडवत असत. केवळ राजेच नाही तर थायलंडचे लोकही देवाला प्रार्थना करण्यासाठी पतंग उडवत असत.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही.
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक.
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा.
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा.
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.