
हिंदू धर्मात मकर संक्रांतीली खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी तिळगुळ देऊन सर्व राग, लोभ, द्वेश विसरून गोड गोड बोलण्याचे आवाहन केले जाते. विशेष म्हणजे दोन व्यक्तींमधील नातं हे चांगलं असावं म्हणूनही जुनी नाराजी विसरून पुढे जाण्यासाठीही आजच्या दिवशी संकल्प केला जातो. त्यामुळे आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील शुभेच्छा संदेश वापरू शकता. विशेष म्हणजे तुम्ही हे संदेश वापरून तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता..
1) पतंगासोबत उंचावो तुमच्या स्वप्नांचा ध्यास,
आनंद, आरोग्य आणि यश लाभो खास.
मकर संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा!
2) जुनी दुःखं मागे टाकून, नवी आशा घेऊन या,
गोड गोड तिळगुळासारखा आनंद जीवनात राहू द्या.
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
3) सूर्यदेव देओ तेज, उर्जा आणि नवी दिशा,
तुमचं आयुष्य उजळो, हीच एक इच्छा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
4) उबदार सूर्यकिरणांनी उजळो प्रत्येक सकाळ,
तिळगुळासारखा गोड राहो जीवनाचा काळ.
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
5) नव्या ऋतूच्या या गोड सणात,
आशा, विश्वास आणि प्रेम लाभो प्रत्येक क्षणात.
मकर संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा!
6) सूर्याच्या तेजासोबत वाढो तुमची प्रगती,
जीवनात सदैव राहो सुख, शांती आणि समृद्धी.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7) जुनी वेदना विसरून, नवी उमेद मनात जपूया,
सूर्याच्या साक्षीने आयुष्य नव्याने घडवूया.
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
8) तिळगुळाच्या गोडव्याइतकं गोड असो नात्यांचं बंधन,
प्रत्येक क्षणी लाभो समाधान आणि आपुलकीचं स्पंदन.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
9) सूर्य उत्तरायणाला, जीवन सुखद वळणाला,
समृद्धी, शांती नांदो तुमच्या अंगणाला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
10) मनात साठलेल्या चिंता हळूच दूर जाऊ दे,
या सणासोबत आनंद आणि समाधान नवे येऊ दे.
मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा
11) सूर्य जसा रोज उगवतो नव्या आशेने,
तसंच तुमचं आयुष्य फुलो नव्या स्वप्नांनी आणि प्रेमाने.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
12) शब्द कमी पडतात कधी भावना सांगायला,
तिळगुळासारख्या गोड आठवणी राहोत आयुष्यभर जपायला.
मकर संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा