कष्ट करूनही भाग्याची साथ मिळत नाही? मंगळवारचे हे उपाय ठरतील लाभदायक

मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय (Mangalwar Upay) केले तर त्याचे त्रास कमी होतात आणि नशीबही बदलू शकते.

कष्ट करूनही भाग्याची साथ मिळत नाही? मंगळवारचे हे उपाय ठरतील लाभदायक
हनुमान Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 10:05 PM

मुंबई : मंगळवार जिथे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, त्याला हनुमानजींचा दिवस देखील म्हणतात. इतकेच नाही तर मंगळ हा ऊर्जेचा कारक मानला जातो. संकटाच्या वेळी किंवा कठीण काळात कार्य सिद्धीसाठी माणसाला पाठबळाची गरज असते. मान्यतेनुसार, जर एखाद्या त्रासलेल्या व्यक्तीने मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय (Mangalwar Upay) केले तर त्याचे त्रास कमी होतात आणि नशीबही बदलू शकते. वैदिक ग्रंथांमध्ये मंगळाचा दिवस सर्वात शुभ आणि कल्याणकारी मानला गेला आहे. या दिवशी राम भक्त हनुमान आपल्या भक्तांची काळजी घेतात.  अथक प्रयत्नानंतरही यश मिळत नाही असे वाटत असेल तर मंगळवारी काही उपाय करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेत तुम्हाला भाग्याची साथ लाभेल.

मंगळवारचे उपाय

  • जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन रामरक्षा स्तोत्राचे पठण करा.
  • मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा, त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसाचे पठण करा.
  • दर मंगळवारी भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. हनुमानाला रुईची पानं आणि तेल वाहावे. हनुमानासमोर सकाळी तुपाचा दिवा तर संध्याकाळी तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. दिव्यासाठी कलावाची वात तयार करून वापरावी.
  • हनुमानाला बुंदीच्या लाडवांचा अथवा चण्याच्या डाळीपासून तयार केलेल्या लाडवांचा प्रसाद अर्पण करावा.
  • शेंदूर आणि चमेलीचे तेल यांचे मिश्रण करून तयार केलेला ओला शेंदूर वापरून हनुमानाच्या मूर्तीला व्यवस्थित लेपन करावे. नंतर भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी.
  • रामाचे नामस्मरण करत 108 तुळीशीची पाने भगवान हनुमानाला वाहावी. प्रत्येक पान वाहताना एकदा रामाचे नाव घेऊन तुळशीचे पान हनुमानाला वाहावे. हनुमानाच्या गळ्यात तुळशीच्या पानांचा हार तसेच रुईच्या पानांचा हार घालावा. नंतर भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. यामुळे भगवान हनुमान तसेच मंगळ प्रसन्न होईल.
  • माकडांना तसेच गायींना भाजलेले चणे, गुळ हे पदार्थ खाऊ घाला. यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि आपला मंगळ कमकुवत असल्यास त्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. मंगळ दोषातून लवकर सुटका होऊ शकेल.
  • दर मंगळवारी यथाशक्ति दान करावे. शक्यतो गरजूंना गहू, तांदूळ, डाळी, गुळ, नारळ, ताजी फळे अशा स्वरुपात दान करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.