Mantra Jaap : 21 दिवसात पुर्ण होताल सर्व इच्छा, फक्त 51 वेळा करा या मंत्राचा जाप!

असे म्हटले जाते की जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिली असेल तर गुरुवारी या मंत्रांचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Mantra Jaap : 21 दिवसात पुर्ण होताल सर्व इच्छा, फक्त 51 वेळा करा या मंत्राचा जाप!
मंत्र जाप
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 09, 2023 | 4:59 PM

मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा-अर्चा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते. या दिवशी गुरू ग्रहाला बलवान करण्याचे उपायही शास्त्रात सांगितले आहेत. या दिवशी श्री हरीची पूजा केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, असा विश्वास आहे. या दिवशी ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हटले जाते की जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिली असेल तर गुरुवारी भगवान नरसिंहाच्या मंत्रांचा जप (Mantra Jaap) केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. देवाचा अवतार विशिष्ट इच्छेच्या आधारावर निवडला पाहिजे. जाणून घ्या कोणत्या अवताराची पूजा कोणत्या इच्छेसाठी करावी.

हे उपाय केल्याने त्रासापासून मिळेल आराम

शत्रूंचा नाश करण्यासाठी

जर तुम्हाला शत्रूंमुळे त्रास होत असेल आणि तुम्ही काही करू शकत नसाल तर हा उपाय तुम्हाला शत्रूंचा नाश करण्यात यश मिळवून देऊ शकतो. गुरुवारी नरसिंहाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. हे मंदिर निर्जन ठिकाणी किंवा जंगलात असेल तर चांगले आहे हे लक्षात ठेवा. अन्यथा तुम्ही ते कुठेही करू शकता. मंदिरात बसून भगवान नरसिंहाच्या मंत्रांचा जप केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळेल.

प्रेमप्रकरणात यश मिळवीण्यासाठी

शास्त्रानुसार प्रेमसंबंधांमध्ये अनुकूल आणि यशस्वी होण्यासाठी गुरुवारी राधा-कृष्णाची सेवा करावी. राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन त्यांना पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई इत्यादी अर्पण करा. यानंतर त्याच्या मंत्रांचा जप केल्यास विशेष लाभ होईल. खऱ्या मनाने केलेली उपासना व्यक्तीला विशेष लाभ देईल.

सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी

तुमची काही विशेष इच्छा असेल, जी सहजासहजी पूर्ण होत नसेल, तर गुरुवारी विष्णुसहस्त्रनाम पठणाचा विधी सुरू करा. स्नानानंतर नियमितपणे भगवान विष्णूची पूजा करा आणि नंतर विष्णु सहस्त्रनामचे 51 पठण करा. हा उपाय तुम्हाला 21 दिवस सतत करावा लागेल. हा उपाय केल्याने तुमची मोठी समस्या देखील दूर होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)