Mata Lakshami 2023 : घरात चुकूनही ठेवू नये माता लक्ष्मीची अशी मुर्ती, लाभा ऐवजी होऊ शकते नुकसान

वास्तविक शुक्रवारचा (Shukrawar Upay) स्वामी शुक्र आहे. शुक्र देव संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य दर्शवतात. शास्त्रात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीचा दिवस म्हणून सांगण्यात आला आहे.

Mata Lakshami 2023 : घरात चुकूनही ठेवू नये माता लक्ष्मीची अशी मुर्ती, लाभा ऐवजी होऊ शकते नुकसान
माता लक्ष्मी
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 23, 2023 | 11:50 AM

मुंबई : शास्त्रामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले गेले आहे. लोकं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध उपाय करून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अनेत जण लक्ष्मीची मूर्ती (Lakshmi Murti) घरात ठेवतात, पण देवीची मूर्ती व्यवस्थित न ठेवल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याची योग्य पद्धत.

या चुका अवश्य टाळा

  •  आपण देवघरात लक्ष्मीची मूर्ती ठेवतो, परंतु अनेक वेळा लोकं चुकून लक्ष्मीची मूर्ती उभ्या स्थितीत ठेवतात जी ठेवू नये. मातेच्या या रुपात केलेली उपासना फळ देत नाही.
  • पुराणानुसार, देवी लक्ष्मी चंचल आहे, त्यामुळे जेव्हाही तिची मूर्ती उभ्या स्थितीत ठेवली जाते, तेव्हा ती त्या ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. लक्ष्मीची बसलेली मूर्ती नेहमी घरात ठेवावी.
  • माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे आणि घुबड देखील चंचल स्वभावाचे आहे, त्यामुळे लक्ष्मीची मूर्ती कधीही घुबडावर बसून असू नये.
  • बहुतांश घरांमध्ये लक्ष्मीची मूर्ती गणपतीसोबत ठेवलेली दिसते. ही पद्धत चुकीची आहे. वास्तविक माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे, त्यामुळे माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबत विष्णूजींना ठेवावे.
  • गणेश आणि माता लक्ष्मी यांना दिवाळीच्या दिवशीच एकत्र ठेवावे. दिवाळीच्या दिवशी घरात सुख-समृद्धी येण्यासाठी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची एकत्र पूजा करावी.
  • माता लक्ष्मीची मूर्ती कधीही भिंतीला लागून ठेवू नये. वास्तूमध्ये तो दोष म्हणून पाहिला जातो. मूर्ती आणि भिंत यामध्ये अंतर ठेवावे.
  • वास्तूनुसार देवघर आणि देवी-देवतांच्या मूर्ती योग्य दिशेने ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. लक्ष्मीची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवावी तरच शुभ परिणाम प्राप्त होतात.
  • अनेक जण देवी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती आणि फोटो आपल्या पूजाघरात ठेवतात ज्याला शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)