AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसोबतच्या डीलनंतर भारताला पहिला मोठा धक्का, रशियातून मोठी बातमी, पुतिन यांच्या एका कॉलमुळे टेन्शन वाढलं

अमेरिकेनं भारतासोबत एक मोठी डील केली आहे, मात्र या डीलनंतर आता भारताला पहिला धक्क बसला आहे. रशियामधून मोठी बातमी समोर येत आहे. पुतिन यांच्या एका कॉलमुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

अमेरिकेसोबतच्या डीलनंतर भारताला पहिला मोठा धक्का, रशियातून मोठी बातमी, पुतिन यांच्या एका कॉलमुळे टेन्शन वाढलं
vladimir putin Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 8:16 PM
Share

भारत आणि अमेरिकेमध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे, भारतासोबत ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे त्यांनी भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के इतका केला आहे, या ट्रेड डीलचा भारताला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे या ट्रेड डीलनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील घडामोडींना वेग आला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी बुधवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी रशियाचे चीनसोबत अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचं सांगत चीन आणि रशियाच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. रशिया आणि चीनची मैत्रीच आता जगात स्थिरता आणू शकते असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.

रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर चीन आणि रशियामधील जवळीक पूर्वीपेक्षाही जास्त वाढली आहे. हे दोन्ही देश परस्परांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. रशिया आणि चीनमध्ये व्यापार, ऊर्जा क्षेत्र यासंबंधी मोठ्या प्रमाणात देवाण -घेवाण सुरू आहे. मात्र रशियासोबत चीनची वाढत असलेल्या जवळीकतेमुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे अलिकडच्या काळात जरी भारताची चीनसोबत जवळीक वाढली असली तरी देखील चीन हा भारताचा जूना शत्रू आहे. त्यामुळे भारताचा मित्र असलेल्या रशियाची भारताचा शत्रू असलेल्या चीनसोबत आता जवळीक आणखी वाढत आहे.

भारताला धोका काय?

व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामधील मैत्री आणि जवळीकता वाढतच आहे. दोन्ही देशांमधील परस्पर सैन्य आणि ऊर्जा संबंध आणखी मजबूत झाले आहेत. अनेक जागतिक मंचावर चीन आणि रशिया एकत्रच उपस्थित राहत आहेत. भारत ऊर्जा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात सध्या तरी रशियावर अवलंबून आहे, तसेच भारत रशिया कडून मोठ्या प्रमाण संरक्षण प्रणाली देखील खरेदी करतो. मात्र जर भविष्यात समजा चीन आणि भारताचा संघर्ष वाढला तर अशा परिस्थितीमध्ये रशिया तटस्थ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत झालेल्या या डीलनंतर व्लादीमीर पुतिन आणि शी जिंनपिंग यांचा हा व्हिडीओ कॉल भारताचं टेन्शन वाढवणारा आहे. दरम्यान रशियाकडून अनेकदा हे स्पष्ट करण्यात आलं आहे, की चीनसोबत असणारी मैत्री ही कोणत्याही देशाच्या धोरणाविरोधात नाही, मात्र तरी देखील अनेकदा यापूर्वी रशिया  चीनच्या मदतीसाठी धावून आला आहे.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?