AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : 4 षटकार-9 चौकार, वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई

U19 World Cup 2026, India vs Afghanistan Semi Final : वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे भारताची ही युवा जोडी पाकिस्तान विरुद्ध निर्णायक सामन्यात अपयशी ठरली होती. मात्र दोघांनीह उपांत्य फेरीत चाबूक खेळी केलीय.

IND vs AFG : 4 षटकार-9 चौकार, वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई
Vaibhav Suryavanshi FiftyImage Credit source: Ashley Allen-ICC/ICC via Getty Images
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 04, 2026 | 8:08 PM
Share

अंडर 19 टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या उपांत्य पूर्व फेरीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. वैभव या निर्णायक सामन्यात 30 धावा करुन बाद झाला होता. मात्र वैभवने उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध आपला तडाखा दाखवला आहे. वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना चाबूक अर्धशतक झळकावत टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर अंतिम फेरीत पोहण्यासाठी 311 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

वैभवचा झंझावात, अफगाणिस्तान विरुद्ध अर्धशतक

एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने हरारे स्पोर्ट्स कल्बच्या मैदानात विजयी धावांचा पाठलाग करताना विस्फोटक सुरुवात केली. वैभवने नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत फटकेबाजी केली. वैभवने चौफेर फटकेबाजी करुन पाहता पाहता अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या अर्धशतकातील 50 पैकी 46 धावा या फक्त चौकार-षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या. वैभवने अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. वैभवने 216.66 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं.

वैभव अर्धशतकानंतर फटकेबाजी सुरु ठेवत मोठे फटके मारत होता. मात्र वैभवला ही खेळी आणखी मोठी करता आली नाही. वैभवला अर्धशतकानंतर फक्त 18 धावाच जोडता आल्या. वैभव 33 चेंडूत 68 धावा करुन बाद झाला. वैभवने या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. वैभवने पहिल्या विकेटसाठी एरॉनसह 9.3 ओव्हरमध्ये 90 रन्सची पार्टनरशीप केली.

कॅप्टन आयुष म्हात्रेचं अर्धशतक

वैभव आऊट झाल्यानंतर तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या कॅप्टन आयुष म्हात्रे यानेही चाबूक बॅटिंग केली. आयुष पाकिस्तान विरुद्ध भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता. मात्र आयुषने या निर्णायक सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. मात्र आयुषही वैभवप्रमाणे अर्धशतकाचं शतकात रुपांतर करण्यात अपयशी ठरला.

आयुषने किती धावा केल्या?

आयुषने तिसऱ्या स्थानी येऊन टीम इंडियासाठी अर्धशतक झळकावलं. मात्र आयुष वैभवच्या तुलनेत संथ खेळी केली. आयुषने 59 बॉलमध्ये 105.08 च्या स्ट्राईक रेटने 62 रन्स केल्या. आयुषने या खेळीत 4 षटकार आणि 5 चौकार लगावले. एरॉन आणि आयुषने दुसऱ्या विकेटसाठी 101 बॉलमध्ये 114 रन्सची पार्टनरशीप केकली. आयुषने यासह टीम इंडियाला विजयी धावांचा आणखी जवळ आणून ठेवलं. आता भारताचे इतर फलंदाज किती षटकं शेष ठेवून विजय मिळवून देतात? याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...