
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला असतो, अशा व्यक्तींचा मुलांक अंकशास्त्रात 2 मानला जातो. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे, जो भावना, मन आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक मानला जातो. अशा मूलांक २ असलेल्यांसाठी २०२६ हे ज्ञान, सर्जनशीलता आणि उच्च शिक्षणाचे वर्ष असेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुकूल राहील. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल; परंतु कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना विशेष दक्षता घ्या. कुटुंबात आनंद राहील, आणि शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, मात्र सप्टेंबरमध्ये सावधगिरी बाळगावी लागू शकते.
विद्यार्थ्यांसाठीही हा काळ सकारात्मक परिणाम देणारा असेल. संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिकता वाढण्यामुळे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आणि सामाजिक वर्तुळही मोठे होईल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या किंवा कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या किंवा सर्व तपशील नीट वाचा व समजून घ्या; अन्यथा फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो.
कुटुंबात सुखद वातावरण राहील आणि तुमच्या ज्ञानामुळे समाजात तुमचा मान वाढेल. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, मात्र बाजारातील जोखीम लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात थोडी अधिक सावधगिरी बाळगा. ताण न घेता संयम ठेवा आणि अतिआत्मविश्वास टाळा.
करिअर : या वर्षी लेखन, माध्यम, कला, कमिशन एजंट, बँकिंग, दागिने, रेकी, गूढविद्या आणि अध्यापन या क्षेत्रांत उत्तम यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अतिआत्मविश्वासामुळे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे संयम आणि सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत चढ-उतार राहू शकतात, म्हणून जोखमीचे गुंतवणूक किंवा धोकादायक उपक्रम टाळा. दरम्यान, नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा नवीन संधी मिळू शकतात. लेखक, पत्रकार, कलाकार आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना आपली प्रतिभा दाखवण्याच्या उत्तम संधी मिळतील; समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते.
नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन : पती-पत्नीचे नाते अत्यंत सुखद आणि प्रेमळ राहील. एकमेकांचे मन ऐकून घेतल्यास बंध आणखी दृढ होतील. अहंकार किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद टाळा, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. छोट्या समस्या वेळीच सोडवल्यास वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद अनुभवता येईल. अविवाहितांसाठी हे वर्ष खास आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते – लग्नाची शक्यता खूप बलवान आहे. प्रेमसंबंध गोड आणि स्थिर राहतील; कुटुंबीय तुमच्या जोडीदाराला सहज स्वीकारतील.
आरोग्य : एकूणच आरोग्य चांगले राहील, जुने आजार बरे होतील. तरीही खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. जास्त चिंता आणि मानसिक तणाव टाळा. त्वचा, हाडे, मधुमेह किंवा छातीशी निगडित तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जोडीदार आणि पालकांच्या आरोग्याचीही काळजी घ्या.
भाग्यशाली रंग : सोनेरी, पिवळा, पांढरा आणि हिरवा हे रंग कपडे, वाहन किंवा दैनंदिन वापरात जास्तीत जास्त वापरा.
भाग्यवान अंक : महत्वाचे निर्णय, फोन नंबर, वाहन क्रमांक किंवा कोणतीही नवीन सुरुवात करताना 1, 2, 3, आणि 5 या अंकांना प्राधान्य द्या. या वर्षी संयम, मेहनत आणि वरील उपाय नियमित केल्यास २०२५ तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी आणि आनंददायी ठरेल!
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)