Nag Panchami 2025 : नागपंचमी 28 की 29 जुलैला? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Nag Panchami : हिंदू धर्मात श्रावण हा व्रतकैवल्यांचा असा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात बरेच सण येतात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.. चला जाणून घेऊयात त्याबाबत सविस्तर

Nag Panchami 2025 : नागपंचमी 28 की 29 जुलैला? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
नागपंचमी 28 की 29 जुलैला? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Image Credit source: File Photo
| Updated on: Jul 25, 2025 | 4:51 PM

हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. कारण चातुर्मासात भगवान विष्णु योगनिद्रेत गेल्यानंतर महादेवांकडे सृष्टीचा गाडा असतो. त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. शिवपुराणात याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा करतात. या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील संकटं दूर होतात. नाग हा भगवान शिवांचा गण मानला जातो. त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवांचाही आशीर्वाद मिळतो. या दिवशी नागाला दूध, फळ आणि नैवेद्य अर्पण केला जातो. यंदा नागपंचमीचा सण 29 जुलैला साजरा केला जाणार आहे. चला जाणून घेऊयात या सणाचं महत्त्व

नागपंचमीचं महत्त्व आणि पूजा विधी

पौराणिक शास्त्रानुसार, नागदेवात पंचमी या तिथीचे स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळतं. या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणंही शुभ मानलं जातं. कालसर्प दोष असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान लाभतं. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीची तिथी 28 जुलैला रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी सुरु होते. तसेच 30 जुलैच्या रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी संपते. पण उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण 29 जुलैला साजला केला जाईल.

नागपंचमीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 42 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. चौघडियाचा शुभ मुहूर्त सकाळी 10 वाजून 47 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यं असेल. तसेच दुपारी 3 वाजून 51 मिनिटे ते संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल. पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी पूजनाचं दुप्पट फळ मिळेल.

नवनाग स्तोत्र

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)