AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nag Panchami: आज नागपंचमी, मुहूर्त, विधी आणि पौराणिक कथा

नाग देवता शिवाचे अलंकार मानले जातात. धार्मिक शास्त्रानुसार, नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फल प्राप्त होतात. साधारणपणे हरियाली तीजनंतर दोनच दिवसांनी नागपंचमीचा सण साजरा केला जातो.

Nag Panchami: आज नागपंचमी, मुहूर्त, विधी आणि पौराणिक कथा
नागपंचमी
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 02, 2022 | 10:45 AM
Share

आज नागपंचमी आहे.  नागपंचमी (Nag panchami 2022) हा सण श्रावण महिन्यातील (Shrawan 2022) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागांच्या पूजेचा हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नाग देवता शिवाचे अलंकार मानले जातात. धार्मिक शास्त्रानुसार, नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फल प्राप्त होतात. साधारणपणे हरियाली तीजनंतर दोनच दिवसांनी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. यावर्षी नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच आज साजरी होत आहे.

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

  1. नागपंचमी, मंगळवार 2 ऑगस्ट 2022
  2. पंचमी तिथी 2 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 05:13 पासून सुरू होईल
  3. पंचमी तिथी 3 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 05:41 वाजता संपेल
  4. नागपंचमी पूजनाचा मुहूर्त सकाळी 06:05 ते 08:41 पर्यंत

नागपंचमीची पूजा विधी

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. नागदेवतांची पूजा करताना हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण केली जातात. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी. यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे. शेवटी नागपंचमीची कथा ऐकावी.

पौराणिक कथा

असे मानले जाते की, श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नाग ब्रह्मदेवांना भेटायला गेले होते आणि त्या दिवशी नागांची शापातून मुक्तता झाली होती. त्या दिवसापासून नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. वराह पुराणानुसार या दिवशी ब्रह्माजींनी आपल्या कृपेने शेषनागाला सजवले होते आणि पृथ्वीचे भार वाहण्याची सेवा घेतली. त्यादिवशी लोकांनी नाग देवतेची पूजा केली होती. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात कालिया या महाकाय नागाचा पराभव करून लोकांचे प्राण वाचवले. तो सापाच्या फडावर नाचायचा आणि त्याला नाग नथैया म्हणत. तेव्हापासून नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते.  समुद्रमंथनात वासुकी नागाचा दोरी म्हणून वापर केला गेला होता. लोकधर्मात नागांचा उल्लेख अर्ध मानवाच्या रूपातही आढळतो. असे मानले जाते की, आपले पूर्वज सापाच्या रूपात अवतरले होते. सापांची आई असलेल्या सुरासा या नावाने मानसा मातेचे मंदिर भारतात अनेक ठिकाणी आहे. जिथे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात, मंदिरांमध्ये नागाच्या मूर्तींना स्नान घालण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी पंचामृताने नागाच्या प्रतिमेला अभिषेक करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार