भयानक ! ‘अग्नी खेली’ इथे लोक एकमेकांवर फेकतात जळत्या मशाली, व्हिडीओ पाहून अंगावर सर्रकन काटाच येईल

| Updated on: Apr 23, 2022 | 8:15 AM

जगात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. अशीच एक गोष्ट सध्या कर्नाटकात (Karnatak) घडत आहे. इथं 'अग्नी खेली' (Agni Kheli) हा उत्सव साजरा होत आहे.

भयानक !  अग्नी खेली  इथे लोक एकमेकांवर फेकतात जळत्या मशाली, व्हिडीओ पाहून अंगावर सर्रकन काटाच येईल
karnataka
Follow us on

मुंबई : जगात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. अशीच एक गोष्ट सध्या कर्नाटकात (Karnatak) घडत आहे. इथं ‘अग्नी खेली’ (Agni Kheli) हा उत्सव साजरा होत आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड (Kannad) जिल्ह्यात असलेल्या श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात या उत्सवात दोन गावातील लोक एकमेकांवर पेटत्या मशाली फेकतात. येथील लोक आठ दिवस अग्नी खेळी हा उत्सव साजरा करतात. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात ‘अग्नी खेळी’ उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाचा एक भाग म्हणून अत्तूर आणि कलत्तूर या दोन गावांतील लोकांनी एकमेकांवर जळत्या मशाली फेकल्या.

इथं पाहा व्हिडीओ

कसा खेळला जातो हा खेळ

‘अग्नी खेली’ उत्सवामुळे आपले दु:ख दूर होते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. इतर सणाप्रमाणे प्रथम दोन्ही गावातील लोक देवीची मिरवणूक काढतात. त्यानंतर नारळाच्या सालींपासून बनवलेल्या मशाली पेटवतात आणि एकमेकांवर पूर्ण जोशात फेकतात. हा खेळ सुमारे 15 मिनिटे चालतो. या खेळामध्ये एखादी व्यक्ती फक्त पाच वेळा मशाल पेटवू शकतो त्यानंतर मशाल विझवून त्याला तेथून जावे लागते.

काय आहे मान्यता

अग्नी खेळी हा उत्सव 8 दिवस चालतो. या काळात दोन्ही गावातील लोक मांसाहार आणि दारूचे सेवन करत नाहीत. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार या खेळामध्ये आर्थिक किंवा शारीरिकदृष्ट्या त्रास झालेल्या लोकांचा सहभाग असतो. असे केल्यास भवानी माता त्यांचे सर्व दु:ख दूर करेल अशी मान्यता आहे.

मंदिराचे वैशिष्ट्य

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात आगीसोबत धोकादायक खेळ खेळला जातो. या खेळाला अग्नी खेळी किंवा तूथेधारा परंपरा म्हणतात. दुर्गा मंदिर हे कटील मंदिर या नावानेही ओळखले जाते ते मंगळुरूपासून 28 किमी अंतरावर आहे. कटील हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. कटी म्हणजे केंद्र आणि इला म्हणजे स्थान. तसेच कटेल म्हणजे नंदिनी नदीच्या मधोमध असलेली जागा असा देखील त्याचा अर्थ होतो.

संंबंधीत बातम्या

Vastu Tips | घरात काटेरी रोप लावल्यास काय होते? जाणून घ्या रंजक माहिती

22 April 2022 | 21 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Surya Grahan 2022 | सावधान ! या सूर्यग्रहणला या राशींच्या व्यक्तींना लागणार ‘ग्रहण’