नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा राजीनामा; राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात, सुमन बेरी नवे उपाध्यक्ष होण्याची शक्यता

नीति आयोगाचे (NITI Aayog) उपाध्यक्ष राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना बनवण्याचे काम नीति आयोगाकडून करण्यात येते. राजीव कुमार हे नीति आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून काम पहात होते.

नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा राजीनामा; राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात, सुमन बेरी नवे उपाध्यक्ष होण्याची शक्यता
अजय देशपांडे

|

Apr 23, 2022 | 7:25 AM

नवी दिल्ली :  नीति आयोगाचे (NITI Aayog) उपाध्यक्ष राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना बनवण्याचे काम नीति आयोगाकडून करण्यात येते. राजीव कुमार हे नीति आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून काम पहात होते. मात्र त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राजीव कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता अर्थशास्त्रज्ञ सुमन बेरी (Suman Beri) हे निती आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने योजना आयोगाचे नाव बदलून नीति आयोग असे केले होते. अरविंद पनगडिया हे नीति आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. अरविंद पनगढिया यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार यांनी 1 संप्टेंबर 2017 पासून नीति आयोगाचा पदभार स्विकारला होता.

1 संप्टेंबर 2017 पासून नीति आयोगाचे उपाध्यक्ष

2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने योजना आयोगाचे नाव बदलून नीति आयोग असे केले होते. अरविंद पनगडिया हे नीति आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. मात्र त्यांनी 2017 मध्ये राजीनामा दिला. पनगडिया यांच्या राजीनाम्यानंतर 1 संप्टेंबर 2017 पासून राजीव कुमार यांनी आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता. राजीव कुमार हे नीति आयोगाचे दूसरे उपाध्यक्ष होते. नीति आयोगाचे उपाध्यक्ष होण्यापूर्वी राजीव कुमार हे ‘फिक्की’चे महासचिव होते. तसेच त्यांनी 1995 ते 2005 या दहा वर्षांच्या काळात अशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून देखील काम पाहिले. तसेच ते काही दिवस अर्थमंत्रालयाचे सल्लागार देखील होते.

कोण आहेत राजीव कुमार?

नीति आयोगाने दिलेल्या वेबसाईटनुसार डॉ. राजीव कुमार यांच्याकडे शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी या दोन क्षेत्रात सरकारसोबत काम केले आहे. त्यांनी आपले शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापिठातून पूर्ण केले. त्यानंतर ते दिल्लीमध्ये इंडियन काउंसिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकोनॉमिक रिलेशन या संस्थेत प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून जॉइन झाले. त्यानंतर त्यांनी 1995 ते 2005 या दहा वर्षांच्या काळात अशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून देखील काम पाहिले. ते काही दिवस अर्थमंत्रालयाचे सल्लागार देखील होते. त्यांनी नीति आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

संबंधित बातम्या

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

LIC IPO : पुढील आठवडा अत्यंत महत्वाचा! आयपीओचा आकार घटणार; घोषणेकडं लक्ष

Gold Rate Today : सोनं लवकरच 55 हजाराचा आकडा गाठण्याची भीती? शुक्रवारी 250 पेक्षा जास्त रुपयांनी सोनं महागलं

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें