AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2023 : नवरात्रीत देवीला दाखवा नऊ दिवस खास नैवेद्य, मिळेल समृद्धीचा आशिर्वाद

शारदीय नवरात्रीला लवकरच सुरूवात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात देवीच्या विविध रूपांची 9 दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते. शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाने समाप्त होईल.

Navratri 2023 : नवरात्रीत देवीला दाखवा नऊ दिवस खास नैवेद्य, मिळेल समृद्धीचा आशिर्वाद
नवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 11, 2023 | 3:04 PM
Share

मुंबई : सनातन धर्मात नवरात्रीच्या (Navaratri 2023) 9 दिवसांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. यापैकी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रोत्सव उत्साहात साजरे केले जातात, तर दोन गुप्त नवरात्रोत्सव आहेत. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात देवीच्या विविध रूपांची 9 दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी उदया तिथीमुळे, शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाने समाप्त होईल. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांना वेगवेगळे नैवेद्य दाखवू शकता.

नवरात्रीत देवीला दाखवा विशेष नैवेद्य

  • पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला कलाकांदचा नैवेद्य दाखवावा. गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणे शुभ असते.
  • दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
  • तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. तिसर्‍या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
  • चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुआ अर्पण करावा. हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होईल.
  • पाचव्या दिवशी माता स्कंदमातेला केळी अर्पण करावी.
  • नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहे. या दिवशी देवीला सुपारी अर्पण करावी.
  • सातव्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते. या दिवशी गुळाची मिठाई अर्पण करावी.
  • आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी.
  • नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी रव्याची खीर, पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी