AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2023 : यंदाच्या नवरात्रीत तीस वर्षानंतर जुळून येतोय दूर्लभ योग, फक्त हा एक उपाय चमकवू शकतो तुमचे भाग्य

रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेसह शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. यंदा नवरात्री 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 24 ऑक्टोबरला दसराही साजरा होणार आहे.

Navratri 2023 : यंदाच्या नवरात्रीत तीस वर्षानंतर जुळून येतोय दूर्लभ योग, फक्त हा एक उपाय चमकवू शकतो तुमचे भाग्य
नवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 12, 2023 | 8:21 AM
Share

मुंबई : देवीच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यानंतर सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू होईल. नवरात्रीचे (Navratri 2023) संपूर्ण नऊ दिवस विधीपूर्वक दुर्गादेवीची पूजा केल्याने भक्तांची प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण होते.  देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध ठिकाणी भंडारा, जागरणाचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी भव्य देखाव्यांसह देवीची स्थापना केली जाते. यावेळी नवरात्र खूप खास आहे. यंदा देवी गजारूढ होऊन येणार आहे. म्हजेच यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे.  दुसरीकडे यंदा नवरात्रीमध्ये 3 दुर्मिळ योगायोग घडणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा योग का शुभ मानला जातो.

नवरात्र कधी सुरू होत आहे?

रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेसह शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. यंदा नवरात्री 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 24 ऑक्टोबरला दसराही साजरा होणार आहे. घटस्थापना म्हणजेच कलश स्थापनेला नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी कन्याभोजाचे आयोजनही केले जाते. असे म्हणतात की, कुमारीकांना भोजनदान केल्याने देवी सर्व मनोकामना पूर्ण करते.

नवरात्रीमध्ये 3 शुभ योग तयार होत आहेत

या वर्षी नवरात्रीची सुरुवात शशा राजयोग, भद्रा राजयोग आणि बुधादित्य योगाने होईल. 30 वर्षांनंतर या तिन्ही योगांचा संयोग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या योगात माता राणीचे पूजन केल्याने लोकांना धन, वैभव, सुख, समृद्धी आणि प्रगतीचा लाभ होतो.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा

  • नवरात्रीपूर्वी कलशाची स्थापना करा
  • देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करा
  • नवरात्रीचे व्रत ठेवा
  • देवीची यथासांग पूजा व आरती करावी
  • देवीला सौभाग्य श्रृंगार अर्पण करा
  • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरा.
  • नवरात्रीच्या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि तामसिक आहारापासून दूर राहा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?