योगिनी एकादशीनिमित्त तुळशीचे हे उपाय, सुख आणि समृद्धीचे उघडतील दरवाजे
योगिनी एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित असून या व्रताने 88 हजार ब्राह्मणांना भोजन करण्याइतकेच पुण्य मिळते. या दिवशी, विष्णूचा विशेष आशीर्वाद, सुख-समृद्धी मिळवण्यासाठी तुळशीशी संबंधित काही विधी करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग तुळशीचे कोणते उपाय करणे तुमच्यासाठी भाग्याचे ठरेल ते जाणून घेऊयात.

वर्षभरात भगवान विष्णूला समर्पित 2 एकादशीचे उपवास मोठ्या श्रद्धेने केले जातात. अधिक मासात या उपवासांची संख्या 26 पर्यंत वाढते. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष प्रार्थना केली जाते. उपवासही केला जातो. द्रिक पंचांगानुसार, यावर्षी योगिनी एकादशीचा उपवास शुक्रवार 10 जुलै रोजी होणार आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की केवळ योगिनी एकादशीचा उपवास केल्याने 88 हजार ब्राह्मणांना भोजन करण्याइतके पुण्य मिळते.
एवढेच नाही तर, योगिनी एकादशीला उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी वाढते. एकादशीच्या पूजा आणि प्रार्थनेसोबतच, तुळशीशी संबंधित काही विशेष उपाय देखील खूप महत्त्वाचे मानले जातात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते, कारण तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. चला तर मग योगिनी एकादशी निमित्त तुळशीचे कोणते उपाय करावे ते जाणून घेऊयात.
योगिनी एकादशीला करा तुळशीचे हे उपाय
कच्च्या दुधात तुळशीच्या मंजिरी मिक्स करून भगवान विष्णूला प्रार्थना करा:
योगिनी एकादशीला स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विधीवत पूजा करा. कच्च्या गाईच्या दुधात तुळशीच्या मंजिरी मिक्स करून ते दूध भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते, असा विश्वास आहे.
तुळशी मातेला शृंगार अर्पण करा:
योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराच्या सर्व वस्तू अर्पण करा. असे मानले जाते की तुळशीमध्ये लक्ष्मी देवीचा वास आहे. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद लाभतो, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सुदैव येते.
तुळशी मातेसमोर दिवा लावा:
एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, तुळशी मातेसमोर 11, 21 किंवा 51 दिवे लावा आणि खऱ्या मनाने व भक्तीभावाने तुळशी मातेची कथा वाचा. असे केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात आणि यशासाठी नवीन संधी उपलब्ध होतात, असा विश्वास आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)