हातावरची ही छोटी रेषा सांगेल, कधी होणार लग्न? कसे असेल वैवाहिक जीवन, एका क्लिकवर घ्या जाणून
Palmistry Marriage Lines: लग्न होणार की नाही ही आजच्या तरुणाईसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. त्यांना याविषयीची माहिती त्यांच्या हातावरील या रेषाच देतील. काय सांगता हस्तेषा तज्ज्ञ तुम्हाला माहिती आहे का?

Palmistry Marriage Lines: हस्तरेषेच्या मदतीने व्यक्तिमत्व, करिअर, भविष्य आणि लग्न केव्हा होईल याची माहिती मिळते असे सांगितले जाते. सध्या लग्नही मोठी समस्या ठरत आहे. मुलांची लग्न होत नसल्याने अनेक गावात आई-वडील चिंतेत आहेत. योग्य वयात अनेकांचे लग्न झालेले नाही. सध्या फसव्या लग्नाच्या अनेक घटना घडत आहेत. पैसे लुटणारे कुटुंबाला आणि तरुणाला मोह जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करत आहेत. पण हातावरील रेषा तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्याबाबत माहिती देतात, असे हस्तरेषा शास्त्र सांगते.
हातावरील विवाह रेषा तरुणी-तरुणाचे लग्न कधी होणार हे सांगतात. काही ठिकाणी एकापेक्षा अधिक रेषा असतील तर अधिक नात्यात गुंतल्याचे लक्षात येईल. त्यासाठी हातावरील विवाह रेषा पाहावी लागेल. ही छोटी रेषा करंगळीच्या खाली बाहेरील बाजूस आडवी असते. या रेषेवरून लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही हे समजते असा हस्तरेषा शास्त्राचा दावा आहे.
कोणत्या वयात होईल लग्न- जर विवाह रेषा हृदय रेषेच्या जवळून जात असेल तर लग्न कमी वयात होते. हृदय रेषा ही सर्वात वरच्या दिशेला असते. ही रेषा करंगळीपासून सुरु होते आणि तर्जनी (index finger) या मध्ल्या बोटापर्यंत (middle finger) जाते.
जर विवाह रेषा ही हृदय रेषा आणि करंगळीच्या मध्यभागी असेल तर लग्न 25 ते 30 वर्ष दरम्यान होते. जर ही विवाह रेषा करंगळीच्या अगदी समीप, जवळ असेल तर लग्न उशीरा होते असे हस्तरेषा शास्त्र सांगते. अशा लोकांचे लग्न हे साधारणपणे 35 वर्षानंतर होते. जर त्यापूर्वी लग्न झाले, तर लग्नात अडचणी येतात. वा विवाहानंतर गैरसमज होतात, असे हे शास्त्र सुचवते.
लग्न रेषेची स्थिती-जर लग्न रेषा अधिक स्पष्ट आणि खोल असेल तर वैवाहिक जीवन सुखी असते. तर ही लग्न रेषा मध्यभागी अंधुक, अस्पष्ट असेल तर नातेसंबंधात चढउतार दिसून येतो. अशावेळी दोघांमध्ये सामंजस्य टिकण्यात अडचण येते.
एका पेक्षा अधिक नाती-जर एका पेक्षा अधिक दोन अथवा त्यापेक्षा अधिक रेषा असतील तर एकापेक्षा अधिक प्रेमसंबंध असतात. त्यामुळे एकापेक्षा अधिक लग्न होण्याची शक्यता पण असते. जर दोन रेषा असतील आणि त्या एकमेकींना भेदत असतील तर मग वैवाहिक जीवनात ताणतणाव असल्याचे संकेत दिसतात असे हे शास्त्र सांगते.
डिस्क्लेमर: ही इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरून घेतलेली सामान्य माहिती आहे. केवळ माहितीस्तव ती सादर करण्यात आलेली आहे. टीव्ही ९ मराठी या दाव्याची पुष्टी करत नाही.
