Pandharpur: चार दिवसात विठूमाऊलीच्या चरणी 50 लाखांचे दान

| Updated on: Aug 21, 2022 | 2:49 PM

चार दिवस पंढरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आलेल्या भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर दक्षिणा टाकली याशिवाय विठ्ठलाचा प्रसाद बुंदी लाडू खरेदी केले. भक्तांनी मंदिरास देणगीही दिली अशा विविध प्रकारे मंदिर समितीला 50 लाखाचे उत्पन्न मिळाले

Pandharpur: चार दिवसात विठूमाऊलीच्या चरणी 50 लाखांचे दान
विठ्ठल रुक्मिणी
Follow us on

सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी (Shri Vitthal) पंढरपुरात (Pandharpur) भाविकांनी गर्दी केली होती.  चार दिवसात मंदिर समितीला 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबद्दल माहिती  दिली. दिनांक 13 ते 16 ऑगस्ट रोजी सलग चार दिवस सुट्टी आल्याने नागरिक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळासाठी घराबाहेर पडले. चार दिवस पंढरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आलेल्या भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर दक्षिणा टाकली याशिवाय विठ्ठलाचा प्रसाद बुंदी लाडू खरेदी केले. भक्तांनी मंदिरास देणगीही दिली अशा विविध प्रकारे मंदिर समितीला 50 लाखाचे उत्पन्न मिळाले तर सुट्टी कालावधीत चार दिवसात सुमारे दोन लाख भाविकांनी विठ्ठलाचे परस्परांचे दर्शन घेतले असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

 

स्थानिक व्यावसायिकांनाही फायदा

सलग चार दिवस लागून सुट्या आल्याने मोठ्यासंख्येने भाविक पंढरपूरला येत आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या या भाविकांमुळे स्थानिक दुकानदारांनासुद्धा याचा फायदा होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष मंदिर बंद होते. याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसला होता. आता भाविकांची गर्दी होत असल्याने पूजा साहित्य विक्री, खेळण्याचे दुकानं आणि धार्मिक साहित्य विकणाऱ्यांना याचा फायदा होत आहे. पंढरपूरमध्ये मुख्य आर्थिक स्रोत भाविकांना देण्यात येणाऱ्या रेवांवर आधारित आहे. हॉटेल, रेस्टोरंट, ऑटो चालक यांची उपजिविकसुद्धा यावरच अवलंबून आहे. मंदिर प्रशासनासोबतच या छोट्या व्यवसायिकांनाच्या उत्पन्नात भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा