AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात चिवट गोलंदाज, बुमराहचा कितवा नंबर?

Most Maiden Overs in IPL : 20 ओव्हरच्या खेळात निर्धाव षटक टाकणं खरचं आव्हानात्मक बाब आहे. मात्र असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आयपीएल स्पर्धेत अचूक टप्पा आणि चिवट बॉलिंगच्या दोरावर सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकल्या आहेत. अशा 7 गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

IPL : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात चिवट गोलंदाज, बुमराहचा कितवा नंबर?
Jasprit Bumrah Mi IplImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 18, 2026 | 8:35 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सध्या जोरात तयारी सुरु आहे. अपवाद वगळता सर्व खेळाडू आपल्या टीमसोबत जोडले गेले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत लीग अशी ओळख असलेल्या या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामाच्या थराराला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. टी 20 स्पर्धा म्हणजे फलंदाजांचा खेळ, असं समीकरण तयार झालं आहे. फलंदाज फटकेबाजीच्या जोरावर टीमला विजयी करतात. मात्र क्वचित असे गोलंदाज असतात जे बॉलिंगच्या जोरावर सामना पालटण्याची क्षमता ठेवतात.

आयपीएल स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये असंख्य मॅचविनर फलंदाज आहेत. तसेच निर्णायक क्षणी कोणताही फलंदाज मॅचविनर होऊ शकतो. मात्र बॉलिंगच्या जोरावर एखाद्या संघाने विजय मिळवलाय, हे असं फार कमी होतं. मात्र काही असे गोलंदाज आहेत जे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना चिवट आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुंडाळण्याची क्षमता ठेवतात. या निमित्ताने आपण या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएलमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम हा टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या नावावर आहे. भुवीने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 14 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये फलंदाज प्रत्येक बॉलवर 4-6 मारण्याचा प्रयत्नात असतात. अशात मेडन ओव्हर टाकणं हे किती आव्हानात्मक असतं हे क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

भुवीनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार विराजमान आहे. प्रवीण कुमार याने आयपीएल कारकीर्दीत 14 मेडन ओव्हर टाकल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज

लसिथ मलिंगा : 8 जसप्रीत बुमराह : 8 धवल कुलकर्णी : 8 इरफान पठाण : 10 ट्रेन्ट बोल्ट : 11 प्रवीण कुमार : 14 भुवनेश्वर कुमार : 14

बुमराहचा कितवा नंबर?

भुवी, प्रवीण कुमार याच्यानतंर ट्रेन्ट बोल्ट तिसऱ्या स्थानी आहे. बोल्ट 10 किंवा त्यापेक्षा अधिक मेडन ओव्हर टाकणारा पहिला विदेशी गोलंदाज आहे. चौथ्या स्थानी इरफान पठाण आहे. इरफानने 10 निर्धाव षटकं टाकण्याची कामगरी केली आहे. तर या यादीत सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याबाबत धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहेत. या तिघांनी प्रत्येकी 8-8 ओव्हर मेडन टाकल्या आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात