AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजल्यानंतर आकडेवारींचा खेळ सुरू झाला आहे. आकडेमोड करत कोण बेस्ट आणि कोण कुठे आहे याचा अंदाज घेतला आहे. इतकंच काय तर आयपीएलचा बेस्ट कर्णधार कोण यावरूनही चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्मा आणि धोनीच्या नाव आघाडीवर आहे. पण आकडे काही वेगळंच सांगतात.

IPL 2026: रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
IPL 2026: रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 18, 2026 | 8:38 PM
Share

आयपीएलचं 19वं पर्व 28 मार्चपासून सुरू होत आहे. आतापर्यंत पार पडलेल्या 18 पर्वात काही फ्रेंचायझींचा दबदबा दिसून आला आहे. यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स पाच जेतेपदांसह आघाडीवर आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन जेतेपद पटकावले आहे. अशा स्थितीत आयपीएलचा बेस्ट कर्णधार कोण याची चर्चा रंगणार हे सहाजिकच आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीने 5-5 वेळा जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे या फ्रेंचायझीचे कर्णधार बेस्ट आहेत असं सांगितलं जातं. पण जेव्हा विजयी टक्केवारींची गोष्ट तेव्हा मात्र हे दोन्ही दिग्गज कर्णधार मागे पडतात. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग बेस्ट कर्णधार कोण? तर या यादीत पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आघाडीवर येतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक चांगली विजयी टक्केवारी श्रेयस अय्यरच्या नावावर आहे. कोलकाता नाईट रायडर्ससह जेतेपद मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरने तीन संघांचं कर्णधारपद भूषवलं आहे. तसेच अंतिम फेरीत पोहोचवलं आहे.

आयपीएल स्पर्धेत सामन्यात कर्णधार भूषवणाऱ्या श्रेयस अय्यरची विजयी टक्केवारी 58.82 टक्के आहे. अय्यरने आतापर्यंत 87 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यात त्याच्या नेतृत्वात 50 विजय मिळवले आहेत. तर 35 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. दुसऱ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं नाव येतं. त्याची विजयी टक्केवारी अय्यर सारखीच 58.82 टक्के आहे. सचिनने 51 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. महेंद्रसिंह धोनी 58.36 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या, शेन वॉर्न 56.36 विजयी टक्केवारीसह चौथ्या आणि रोहित शर्मा 56.32 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्सला जेतेपद मिळवून देणार का?

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्ससला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण यावेळी पंजाब किंग्स संघ पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. पंजाबचा पहिला सामना 31 मार्चला गुजरात टायटन्सशी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सुरुवात कशी होते याकडे लक्ष असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत वाढ होत जाईल. आता या पर्वात पंजाब किंग्स किती सामने जिंकते यावरून विजयी टक्केवारीचं गणित ठरेल.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ