AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेला उरले फक्त 10 दिवस! दहा फ्रेंचायझींच्या या 10 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून आता फक्त 10 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत दहा संघ असणार आहे. प्रत्येक संघातील एक खेळाडू हे पर्व गाजवणार आहे. प्रत्येक फ्रेंचायझीमधील फॉर्मात असलेल्या या खेळाडूंवर असेल नजर...

IPL 2026 स्पर्धेला उरले फक्त 10 दिवस! दहा फ्रेंचायझींच्या या 10 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर
IPL 2026 स्पर्धेला उरले फक्त 10 दिवस! यावेळी दहा फ्रेंचायझींच्या या 10 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजरImage Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 18, 2026 | 8:11 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार हे दोन महिन्यांनी कळेल. पण त्यापूर्वी काही संघ प्रबळ दावेदार मानले जात आहे. असं असलं तरी कोण बाजी मारेल काहीच सांगता येत नाही. मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघांनी चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. पण अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं नाणं खणखणीत वाजलं. तसेच 18 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. आता या पर्वात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. असं असताना दहा फ्रेंचायझीमध्ये एक असा खेळाडू हुकूमाचा एक्का ठरू शकतो. त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.

  1. चेन्नई सुपर किंग्स हा या स्पर्धेतील पाचवेळा विजेता ठरलेला संघ आहे. पण मागच्या काही वर्षात संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. मात्र यावेळी मिनी लिलावात आणि ट्रेंड विंडोच्या माध्यमातून काही बदल केले आहेत. एक हुकूमाचा एक्का चेन्नई सुपर किंग्सने घेतला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून संजू सॅमसन आहे. संजू सॅमसन हा सध्या फॉर्मात असून सामन्याचं चित्र बदलू शकतो. टी20 वर्ल्डकप 2026 त्याचा हिसका प्रतिस्पर्धी संघांनी घेतला आहे.
  2. दिल्ली कॅपिटल्स संघाची जेतेपदाची झोळी अजूनही रितीच आहे. पण यावेळी संघात काही बदल केले आहेत. असं केएल राहुलच्या सांगण्यावरून फ्रेंचायझीने बेन डकेटवर बोली लावली. हा खेळाडू या स्पर्धेत काही चमत्कार करू शकतो. दिल्लीला चांगली सुरूवात करून देईल असा विश्वास चाहत्यांना वाटतो. इंग्लंडचा बेन डकेट पहिल्यांदाच आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे पहिल्याच स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो.
  3. गुजरात टायटन्स फ्रेंचायझी संघ बांधणीत कमकुवत पडल्याचं दिसत आहे. पण असं असलं तरी संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. या संघात चांगले फलंदाज आहेत. पण गोलंदाजांच्या बाबतीत हा संघ ताकदवान वाटत आहे. या स्पर्धेत कागिसो रबाडा गुजरात टायटन्ससाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. पावर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये धावगती रोखण्यात मदत करू शकतो.
  4. केकेआर संघाची गोलंदाजीची धार यावेळी कमी झाली आहे. हर्षित राणा नाही आणि मुस्तफिझुर रहमानला वगळल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे या संघाची धुरा फलंदाजांवर अधिक अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत अष्टपैलू सुनील नरीनकडून फार अपेक्षा असतील. हा खेळाडू चांगली सुरूवात करून देण्याची ताकद ठेवतो. जर तसं झालं तर प्रश्नच येत नाही.
  5. लखनौ सुपर जायंट्स हा संघ जेतेपदाच्या असणार आहे. या संघातही आक्रमक फलंदाजी करणाऱ्या संघांचा भरणा आहे. पण फॉर्मात असलेल्या एडन मार्करममुळे चांगली सुरूवात मिळू शकतो. एडन मार्करम या संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. हा खेळाडू चालला तर संघही तरेल.
  6. मुंबई इंडियन्स संघात तर एका पेक्षा एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे या संघात कोण काय करेल ते सांगता येत नाही. फलंदाजीत तर एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज आहे. पण असं असलं तरी जसप्रीत बुमराह हा सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे मुंबईसाठी जसप्रीत बुमराह हा हुकूमाचा एक्का ठरू शकतो.
  7. पंजाब किंग्सचं जेतेपद मागच्या वर्षी एका विजयाने हुकलं. पण पुन्हा एकदा हा संघ तयारीला लागला आहे. या संघात श्रेयस अय्यर हाच मुख्य भूमिका बजावू शकतो. कारण त्याच्याकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. तसेच दबावात कसं खेळायचं हे त्याला माहिती आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर या संघाला जेतेपदाच्या वेशीपर्यंत नेऊ शकतो.
  8. राजस्थान रॉयल्स संघाची बांधणीही चांगली झाली आहे. आक्रमक फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारू शकतात. शिमरोन हेटमायर हा सामना पालटू शकतो. इतकंच काय तर फिनिशरची भूमिका बजावू शकतो. सध्या त्याचा फॉर्मही चांगला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
  9. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गतविजेता असून यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान आहे. असं असताना अष्टपैलू रोमारिया शेफर्ड हा या संघाचा तारणहार ठरू शकतो. त्याच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजीने सामना फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
  10. सनरायझर्स हैदराबादमधील फलंदाजीचा क्रम पाहिला तर गोलंदाजांना गोलंदाजी करताना घाम फुटेल. पण गोलंदाजीत हा संघ कमकुवत दिसत आहे. कारण पॅट कमिन्स सुरूवातीच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे इशान किशन कर्णधार आहे. त्याचा फॉर्मही जबरदस्त आहे. त्यामुळे इशान किशन हाच मुख्य आणि महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ