Pandharpur wari 2022: आज सासवड येथे असेल माउलींच्या पालखीचा मुक्काम

तब्बल दोनवर्षांच्या खंडानंतर वारकऱ्यांची पाऊलं पंढरीकडे (Pandharpur wari 2022)पडू लागली आहेत. विठ्ठलाच्या जयघोषाने वारी दुमदुमत असून टाळ मृदूंगाच्या तालावर भक्तांची पाऊलं थिरकत आहे. कोणी  फुगड्या घालत आहेत, तर कोणी खेळ खेळत आहेत. वारीतल्या सर्व भक्तांना आता विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जवळपास चार लाख भाविक आळंदी येथे दाखल झाले होते. […]

Pandharpur wari 2022: आज सासवड येथे असेल माउलींच्या पालखीचा मुक्काम
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 5:45 AM

तब्बल दोनवर्षांच्या खंडानंतर वारकऱ्यांची पाऊलं पंढरीकडे (Pandharpur wari 2022)पडू लागली आहेत. विठ्ठलाच्या जयघोषाने वारी दुमदुमत असून टाळ मृदूंगाच्या तालावर भक्तांची पाऊलं थिरकत आहे. कोणी  फुगड्या घालत आहेत, तर कोणी खेळ खेळत आहेत. वारीतल्या सर्व भक्तांना आता विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जवळपास चार लाख भाविक आळंदी येथे दाखल झाले होते. 21 तारखेला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी पहाटे चार वाजता घंटानाद, काकड आरती आणि अभिषेक झाला. त्यानंतर 9 ते 11 या वेळामध्ये वीणा मंडपात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी माऊलीच्या समाधीची आरती करण्यात आली. प्रमुख मानकऱ्यांना नारळ आणि प्रसाद वाटप करून माऊलीच्या पादुका मंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. परंपरेनुसार सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात झाला.

पुण्याहून निघताना  ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण सारखाच उत्साहाने वावरत होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शहराने पुन्हा तीच उर्जा आणि चैतन्य अनुभवले. वारकऱ्यांनी गायलेल्या विविध अभंगांसह मृदूंगावर प्रत्येकजण विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला.

दोन्ही पालख्यांच्या दिंड्या संगमवाडी पुलावर विलीन होऊ लागल्याने आनंद आणि भक्ती द्विगुणित झाली होती. पालखी मार्गस्थ होत असताना कुतूहलाने रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक नागरिक जमले. काही संस्थांनी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी मंडपाची व्यवस्था केली होती आणि अनेकांनी पालखीची ऊर्जा वाढवण्यासाठी बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले होते. त्यानंतर 22 आणि 23 तारखेला पुण्यात मुक्काम केला. आज 24 उद्या 25 जूनला सासवड (Saswad)  येथे पालखीचा मुक्काम असेल. सासवड येथील ग्रामस्थ पालखीची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्याच्या काळात नगरपालिकेची आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत सुविधा व स्वच्छतेची तयारी पूर्ण झाली आहे.  सासवड नगरपालिकेने पालखी काळात सासवड शहर आणि परिसरात कचरा संकलनासाठी 20 वाहने व 150 कर्मचारी नेमले आहेत. पालखीतळाची स्वच्छता, खांबावरील विजेचे दिवे, पालखी तंबूजवळ लाईटची व्यवस्था जनरेटरसह केली आहे.

हे सुद्धा वाचा

हाय मास्टची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसविण्यात आठे आहेत. भाविकांना दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावण्याची व्यवस्था केली आहे. पालखीतळावर महिलांसाठी व पुरुषांसाठी एकूण 32 सीट्स शौचालय व 16 सीट्स स्रानगृहे बांधण्यात आली आहेत. तसेच, ते अपुरे पडत असल्याने पालखीतळाशेजारील जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे फायबरचे महिला व पुरुषांसाठी 150 सीट्स शोचालयांची उभारणी करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात स्रानगृहाची उभारणी, त्यासाठी लागणारे पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.