AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डीत भाविकांची मांदियाळी; उन्हाळी सुट्टयांचा‌ आज शेवटचा दिवस

शिर्डी, आज रविवार असल्याने साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत मोठ्या संख्येने गर्दी केली आहे (people rush in shirdi). या महिन्यातला शेवटचा शनिवार-रविवार (weekend) अशी सुटी लागून आली आहे, तसेच सोमवारपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याने मुलांसोबतच पालकांचीही पावलं शिर्डीकडे वळली आहे. शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र […]

शिर्डीत भाविकांची मांदियाळी; उन्हाळी सुट्टयांचा‌ आज शेवटचा दिवस
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 12, 2022 | 1:32 PM
Share

शिर्डी, आज रविवार असल्याने साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत मोठ्या संख्येने गर्दी केली आहे (people rush in shirdi). या महिन्यातला शेवटचा शनिवार-रविवार (weekend) अशी सुटी लागून आली आहे, तसेच सोमवारपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याने मुलांसोबतच पालकांचीही पावलं शिर्डीकडे वळली आहे. शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने मंदिर बंद होते, त्यामुळे अनेकांना देवदर्शन घेता आले नाही. आता सर्व निर्बंध हटविल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहे. मंदिर सुरु झाल्यापासून 65 लाख भाविकांनी साई बाबांचे दर्शन घेतले. यातून संस्थानाला 188 कोटींची देणगी मिळाली आहे. साई बाबांचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे अनेक भाविक सढळ हाताने दान करतात. यासोबतच मंदिर परिसरात असलेली दुकानंसुद्धा फुललेली दिसत असून स्थानिक व्यवसायिकांनासुद्धा याचा फायदा होत आहे.  कोरोना आधीचा काळ आणि कोरोनानंतरच्या काळावर नजर टाकल्यास दानाच्या रकमेत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवीन कोरोनाबाधित होत असल्याने चिंता वाढली आहे. अशातच पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची भीती भक्तांमध्ये असल्याने लाखों भक्त शिर्डी येथे दर्शनासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून आले. शाशनाकडून कोरोनासंदर्भात सध्यातरी कुठलेच निर्बध आलेले नाहीत, पण कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता लवकरच पाऊलं उचलली जाऊ शकतात अशी शक्यता आहे. शिर्डी व्यतिरिक्त इतरही धार्मिक स्थळी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करीत आहेत.

Follow Us
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन