Chanakya Niti : छोट्या विचारांचे लोक केवळ धनामागे धावतात, तर महान लोकांना सन्मान हवा, चाणक्य यांनी सांगितलं यशस्वी जीवनाचं सूत्र

आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांचे विचार आजच्या काळातही मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. चाणक्य म्हणतात जे छोट्या विचारांची माणसं असतात, ते आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावतात, परंतु असे लोक आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : छोट्या विचारांचे लोक केवळ धनामागे धावतात, तर महान लोकांना सन्मान हवा, चाणक्य यांनी सांगितलं यशस्वी जीवनाचं सूत्र
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 8:33 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात. चाणक्य म्हणतात एखादा व्यक्ती महान का होतो तर तो इतरांपेक्षा वेगळा विचार करतो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपलं आयुष्य सुखा समाधानात व्यतीत व्हावं. आपल्याला जगातील सर्व सुख मिळावं. आपल्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये. आपलं कुटुंब आनंदी असलं पाहिजे. मात्र असा जे लोक विचार करतात ते लोक सामान्य असतात. कारण इतर सर्वजण जसा विचार करतात तसाच विचार हे लोक देखील करतात. मात्र जे लोक महान असतात ते कधीही पैशांच्या मागे धावत नाहीत, त्यांना समाजात मान -सन्मान हवा असतो. विचारातील हाच फरक व्यक्तीला महान बनवतो, अशाच व्यक्तीला जगाची मान्यता मिळते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पैशांच्या मागे धावू नका –चाणक्य म्हणतात जर तुम्हाला खरोखरच महान बनायचं असेल तर नुसतं पैशांच्या मागे धावू नका, कारण जी व्यक्ती फक्त पैशांच्या मागे धावते, ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहते, अशा व्यक्तीला जगात कधीही सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. आपण जगाचं काहीतरी देणं लागतो, याची जाणीव माणसानं कायम ठेवावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

महान लोकांची ओळख – चाणक्य म्हणतात जे महान लोक असतात ते आपल्या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ तर करतातच परंतु आपण जगाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव त्यांना कायम असते. अशा लोकांना जगात सन्मान प्राप्त होतो. अशी लोक आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या विचाराने जगात जिवंत राहतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us