AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टींवर कधीच विश्वास ठेवू नका, चाणक्य यांचे हे विचार आयुष्य बदलून टाकतील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते माणसाने आपल्या आयुष्यात कोणत्या चुका टाळाव्यात? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : या तीन गोष्टींवर कधीच विश्वास ठेवू नका, चाणक्य यांचे हे विचार आयुष्य बदलून टाकतील
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 8:02 PM
Share

आर्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते, सोबतच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. मानसानं आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं? भविष्यात येणारे धोके कसे ओळखावेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आर्य चाणक्य म्हणतात माणसानं प्रत्येक वेळी सावध असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यात कधी कोणता प्रसंग कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही, त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी माणसानं तयार असलं पाहिजे. तसेच जर तुमचा वाईट काळ सुरू असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम सोडता कामा नये. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवा, मात्र तो आंधळा विश्वास नसावा, यामुळे तुमचं भविष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात जगात अशा काही गोष्टी आहेत, ज्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका, जेव्हा तुम्ही या गोष्टींचा सामना कराल तेव्हा तुम्ही सावध असलं पाहिजे, अन्यथा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

स्वार्थी मित्र – चाणक्य म्हणतात सगळेच मित्र हे काही तुमचे हितचिंतक असत नाहीत, हे जग स्वार्थाने भरलेलं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्यामध्ये त्याचा स्वार्थ दिसायला लागतो, त्यावेळी असा व्यक्ती तुमच्याशी मैत्री करतो. तो आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे असे लोक तुम्हाला ओळखता आले पाहिजे. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवता कामा नये, जर तुम्ही या लोकांवर विश्वास ठेवला तर भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे स्वार्थी मित्रांवर कधीही विश्वास ठेवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

पाणी – चाणक्य म्हणतात जे पाण्याचे स्त्रोत आहेत, जसं की समुद्र नदी यावर कधीही विश्वास ठेवू नका, नेहमी सावध राहा. अशा ठिकाणी कधीही तुमचा घात होऊ शकतो. जर तुम्ही बेसावध राहिलात तर अशा ठिकाणी तुमची गाठ ही मृत्यूशी देखील पडू शकते.

हिंस्त्र प्राणी – चाणक्य म्हणतात जे प्राणी हिंस्त्र आहेत, जसं की वाघ, सिंह किंवा इतर जे तुम्हाला इजा करू शकतात, ज्यांच्या स्वभावातच हिंस्त्रपणा आहे, अशा प्राण्यांवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका, कारण हे प्राणी तुम्ही पाळले जरी असतील तरी ते एक न एक दिवस तुमचा नक्कीच घात करतील. तसेच असे लोक ज्यांचा स्वभाव हिंस्त्र आहे, त्यांना कोणत्याही गोष्टींवरून लगेच राग येतो, अशा लोकांपासून देखील सावध राहणं गरजेचं असतं, कारण असे लोक तुम्हाला इजा पोहचू शकतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा