“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ
Ajit Pawar Baramati: अजित पवार यांच्या अकालीन निधनानंतर बारामतीत समस्यानी डोकं वर काढलं की काय? असा सवाल विचारल्या जात आहे. बारामतीकरांनी याविषयी पवार कुटुंबियांना खुलं पत्र लिहून तक्रार केली आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांना बारामतींकरांनी मोठे आव्हान केले आहे. दादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

जरा बारामतीकडेही लक्ष द्या, अशी अर्जव बारामतीकरांनी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पण दादा गेल्याने बारामती पोरकी झाल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. अजितदादानंतर वाढत्या गुन्हेगारीमुळे बारामतीकर हवालदिल झाले आहेत. आता या शहराकडे पवार कुटुंबियांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांनी खुले पत्र लिहिले आहेत. त्यात पवार कुटुंबाला शहरातील नागरी समस्या आणि गुन्हेगारीबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यावर लवकर उपाय योजना करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दादा गेल्यापासून बारामती पोरकी झाल्याची खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. तर नागरी समस्येसह गुन्हेगारांनी डोके वर केल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बारामतीकरांचे पवार कुटुंबियांना खुले पत्र
दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासकीय मनमानी यामुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर एका जागरूक बारामतीकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ आणि जय आणि युगेंद्र पवार यांना थेट पोस्टकार्डद्वारे खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात दादांची किती उणीव नागरिकांना भासत आहे हे समोर आले आहे. दादाविना बारामती पोरकी झाल्याचा दावा या पत्रातून करण्यात आली आहे.
दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी
“दादांच्या निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली असून, कृपया बारामतीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्या,”अशी आर्त साद या पत्रातून घालण्यात आली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यात समस्याचा पाढा वाचण्यात आला. शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि नागरी समस्येवर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दादा असताना बारामतीच्या प्रशासनावर त्यांचा वचक होता. दादा सकाळीच बारामती शहरात आढावा घेत. अनेक ठिकाणी ते भेटी देत. त्यामुळे बारामती शहराला एक शिस्त लागलेली होती. स्वच्छतेवर लक्ष देण्यात येत होते. पण दादा गेले आणि या शहराला मरगळ आल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. पवार कुटुंब आता बारामतीतील गुन्हेगारीवर वचक बसवण्यात यशस्वी ठरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
