AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओची प्राईम ऑफर पुन्हा सुरू, या कमी किमतीत वर्षभराचा प्लॅन लॉक करण्याची संधी

जिओ प्राईम पुन्हा एकदा लाँच करण्यात आले आहे. वापरकर्ते आता फक्त या कमी किमतीमध्ये वर्षभरासाठीचा हा प्लॅन लॉक करून सततच्या रिचार्ज करण्याच्या चिंतेतून मुक्तता मिळेल. चला तर मग या प्लॅनमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊयात.

जिओची प्राईम ऑफर पुन्हा सुरू, या कमी किमतीत वर्षभराचा प्लॅन लॉक करण्याची संधी
Jio PrimeImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 30, 2026 | 3:23 PM
Share

मोबाईल रिचार्जच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसत आहे. रिचार्ज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओ कंपनीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मासिक मोबाईल रिचार्जच्या दरवाढीबद्दल चिंतित असाल, तर जिओने तुमच्या सर्वात मोठ्या चिंतेवर तोडगा काढला आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय जिओ प्राइम मेंबरशिप एका पूर्णपणे नवीन स्वरूपात आणि आकर्षक लाभांसह पुन्हा सादर केली आहे.

तर जिओ प्राईम वापरकर्ते आता फक्त एकदाच 300 रूपये भरून वर्षभरासाठी महागड्या रिचार्जची चिंता दूर करू शकता. त्यातच जे जिओ ग्राहक दर महिन्याला किंवा ठराविक वेळी जिओ रिचार्ज करतात, त्यांना याचा थेट फायदा होऊ शकतो. ही बातमी विशेषतः 299 रूपयांचा प्लॅन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची आहे. तर जिओने स्पष्ट केले आहे की त्यांचा 299 रूपयांचा प्लॅन सुरूच राहील. प्राईम मेंबरशिप खरेदी केल्यानंतर ग्राहक हा प्लॅन सध्याच्या दरात एक वर्षासाठी वापरू शकतील. चला तर या नवीन प्राइम प्लॅनबद्दल, त्याच्या फायद्यांबद्दल आणि तुम्ही त्याचा कसा लाभ घेऊ शकता याबद्दल जाणून घेऊयात.

300 रुपयांचा जिओ प्राईम प्लॅन काय आहे?

सोप्या भाषेत सांगायचे तर, ही एक प्राईस लॉक किंवा टॅरिफ गॅरंटी योजना आहे. दूरसंचार बाजारातील सतत वाढणाऱ्या रिचार्जच्या खर्चामुळे अनेक कंपन्या वारंवार मोबाईल प्लॅन्सच्या किमती वाढवत आहेत. आपल्या ग्राहकांना या वाढत्या महागाईपासून वाचवण्यासाठी जिओने ही मेंबरशिप पुन्हा सुरू केली आहे.

जर तुम्ही 300 रुपये भरून जिओ प्राइम सदस्य झालात, तर तुमच्या सध्याच्या पसंतीच्या प्लॅनच्या किमती पुढील एक वर्षासाठी म्हणजेच ५ सप्टेंबर 2027 पर्यंत, पूर्णपणे तशीच राहील. तर ही मेंबरशिप 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की या कालावधीत जिओने आपल्या प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅनच्या किमती कितीही वाढवल्या तरी, तुम्हाला तुमच्या सध्याच्या प्लॅनसाठी जुनी, कमी किंमतच द्यावी लागेल.

प्राइस लॉकमुळे तुम्हाला मिळतील मोठे फायदे

कॅशबॅक व्हाउचर्स – सदस्यत्वासाठी नोंदणी केल्यावर तुम्हाला एकूण 600 रूपयांचे कॅशबॅक व्हाउचर्स मिळतील. यातील 300 रूपये नवीन JioPC किंवा JioHome सेटअप खरेदी करण्यासाठी वापरता येतील आणि उर्वरित 300 कुटुंब किंवा मित्रांसाठी नवीन Jio सिम कार्ड खरेदी करण्यासाठी वापरता येतील.

याव्यतिरिक्त, प्राईम मेंबरशिपमध्ये कॅशबॅक व्हाउचर्स आणि जिओच्या डिजिटल सेवांशी संबंधित इतर लाभांचाही समावेश असेल. कंपनीने केवळ रिचार्ज ऑफर्स पुरते मर्यादित न ठेवता, याला त्यांच्या संपूर्ण डिजिटल सेवांच्या नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सदस्यत्वाच्या संपूर्ण वर्षादरम्यान, कंपनी वेळोवेळी केवळ प्राइम सदस्यांसाठी विशेष प्रमोशनल डील्स आणि ऑफर्स देखील जाहीर करत राहील.

जिओचा प्राइम मेंबरशिप प्रोग्राम सर्व विद्यमान प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी खुला आहे. तुम्ही लहान रिचार्जवर असाल किंवा मोठ्या वार्षिक प्लॅनवर तुम्ही या सुरक्षा कवचाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही तुमच्या फोनमधील MyJio ॲप उघडून, जिओच्या अधिकृत वेबसाइट Jio.com ला भेट देऊन, किंवा तुमच्या जवळच्या जिओ स्टोअर किंवा पार्टनर स्टोअर्सना भेट देऊन आणि थेट 300 रूपये भरून ही मेंबरशिप त्वरित सुरू करू शकता.

जिओचे हे पाऊल पहिल्या प्राईम लाँचपेक्षा बरेच वेगळे आहे. कंपनीने 2017 मध्येआपल्या सुरुवातीच्या ग्राहकांसाठी जिओ प्राईम लाँच केले होते. त्यावेळी प्राईम सदस्यत्व शुल्क फक्त 99 रुपये होते आणि त्यासोबत विशेष रिचार्ज व जिओच्या डिजिटल सेवांचे फायदे मिळत होते.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती