AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिक्षण मंत्रालयाचा तडकाफडकी निर्णय, 600 जणांची हकालपट्टी

National Testing Agency : शिक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर परीक्षा टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तब्बल 600 तज्ज्ञांना हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी नव्या तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

मोठी बातमी! शिक्षण मंत्रालयाचा तडकाफडकी निर्णय, 600 जणांची हकालपट्टी
pralhad joshi meetingImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 18, 2026 | 11:25 PM
Share

NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या परीक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी फॉलो-अप बैठक घेतली. या बैठकीत परीक्षांचे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशांनंतर NTA च्या महासंचालकांनी संस्थेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच या बैठकीनंतर परीक्षा टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तब्बल 600 तज्ज्ञांना हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी नव्या तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रश्नपत्रिकेच्या तपासणीसाठी 4-स्तरीय व्यवस्था

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची तपासणी अधिक सुरक्षित आणि प्रभावी करण्यासाठी चार-स्तरीय प्रश्नपत्रिका तपासणी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून अंतिम तपासणीपर्यंतच्या प्रक्रियेत अधिक खबरदारी घेतली जाणार आहे. याशिवाय पुढील दोन ते तीन आठवड्यांत 20 ते 25 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. भविष्यात आणखी अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या योजनेचाही आढावा घेण्यात आला आहे.

NTA कार्यालयांमध्येही मोठा बदल

NTA ची कार्यालये लवकरात लवकर नव्या ठिकाणी स्थलांतरित केली जाणार आहेत. नव्या कार्यालयांमध्ये CISF च्या पथकांमार्फत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येणार असल्याची माहिती NTA महासंचालकांनी दिली आहे. NTA च्या परीक्षा व्यवस्थेतील हे बदल अशा वेळी करण्यात येत आहेत, जेव्हा संस्थेच्या परीक्षांची निष्पक्षता, पारदर्शकता आणि सुरक्षितता यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. NTA कडून JEE (Main), NEET (UG), CUET (UG) आणि UGC-NET यांसारख्या प्रमुख प्रवेश आणि पात्रता परीक्षा घेतल्या जातात. आता यात मोठे बदल पहायला मिळत आहेत.

NTA ने 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना हटवले

यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्रालयाने परीक्षांमधील वादांच्या पार्श्वभूमीवर NTA ने परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना हटवले होते. तसेच 10 नव्या व्यावसायिक नेतृत्वाच्या पदांवर नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती.

कोणत्या पदांवर भरती होणार?

शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, NTA मध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, चीफ फायनान्स ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, टेस्ट सिक्युरिटीसाठी जनरल मॅनेजर आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसेच सायकोमेट्रिक्ससाठी जनरल मॅनेजर यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर भरती केली जात आहे. याशिवाय सायबर सिक्युरिटी, सायकोमेट्रिक्स आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात NTA च्या परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञान, सुरक्षा आणि प्रश्नपत्रिका तपासणीच्या पातळीवर मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात