AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंडली दोष दूर करण्यासाठी श्रावणातील शिवरात्रीला करा रुद्राभिषेक, जाणून घ्या महत्त्व आणि इतर गोष्टी

Rudrabhishek on Shravan Shivratri : महादेवांना श्रावण हा महिना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवांची मनोभावे पूजा केली जाते. त्या त्या सोमवारी शिवलिंगावर अभिषेक केला जातो. श्रावणातील शिवरात्रीला केलेला रुद्राभिषेक अनेक पटीने फलदायी ठरतो.

कुंडली दोष दूर करण्यासाठी श्रावणातील शिवरात्रीला करा रुद्राभिषेक, जाणून घ्या महत्त्व आणि इतर गोष्टी
कुंडली दोष दूर करण्यासाठी श्रावणातील शिवरात्रीला करा रुद्राभिषेक, जाणून घ्या महत्त्व आणि इतर गोष्टी
| Updated on: Jul 22, 2025 | 8:28 PM
Share

श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना.. या महिन्यात अनेक धार्मिक सण येतात. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व अधिक आहे. या महिन्यात भगवान शिवांची मनोभावे पूजा केली जाते. चार्तुमासात पृथ्वीचा कारभार महादेवांकडे असतो. त्यामुळे महादेवांच्या पूजेचं विधान सांगितलं गेलं आहे. भगवान शिवांना रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. रुद्राभिषेक विधीनुसार केला तर कुंडलीतील दोष सौम्य होतात. तसेच भक्तांच्या इच्छाही पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, रुद्राभिषेकामुळे सर्व दु:खातून दिलासा मिळतो अशी भावना आहे. शास्त्रात वर्णन केलेल्या रुतम्-दु:खम्, द्रावयति-नाशयतीतिरुद्र: या श्लोकाचा अर्थच महादेव सर्व दु:खाचा नाश करतात असं आहे. कुंडलीतील दोष रुद्राभिषेक केल्याने दूर होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिना 25 जुलैपासून सुरु होत आहे. तसेच 21 ऑगस्ट रोजी या महिन्यातील शिवरात्री आहे. या शिवरात्रीला श्रावणी शिवरात्री म्हणतात.

रुद्राभिषेक कसा करावा? जाणून घ्या पद्धत

रुद्राभिषेक सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम भगवान गणेशाचा अभिषेक करा. फुले, नैवेद्य, दुर्वा इत्यादी अर्पण करा. इतर देवतांचं आवाहन करून नवग्रह पूजा करा. त्यानंतर भगवान शिवाचं ध्यान करा. बेलपत्र घ्या आणि त्यावर ओम लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. अभिषेक करण्यासाठी, गंगाजल, दूध, उसाचा रस इत्यादी पाण्यात एकत्र मिसळा. रुद्री पाठ करा. त्यानंतर शृंगीमध्ये पाणी घाला आणि हळूहळू शिवलिंगावर अभिषेक करा. रुद्रस्त्राध्यायीचा जप करा. जर तुम्हाला रुद्रास्राध्यायी येत नसेल तर ओम नमः शिवायचा जप करा.

रुद्राभिषेकाचे फायदे काय आहेत?

महादेवांचा रुद्र अभिषेक करण्याचे अनेक फायदे धर्मशाश्त्रात सांगितले आहेत. भगवान शिवाचा रुद्र अभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच धनप्राप्ती होते. वाईट नजर आणि तंत्रापासून संरक्षण होते. नकारात्मकता दूर होते. शिव रुद्राभिषेक केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था