AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 वर्षानंतर या तीन राशींच्या नशिबात येणार राजयोग, ग्रहमंडळातील स्थिती ठरणार लाभदायी

Rare Triple Rajyog After 500 Years : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक दिवशी काही ना काही घडमोड ग्रहमंडळात होत असते. असाच एक योग 500 वर्षानंतर जुळून येत आहे. तीन राजयोग एकाच वेळी येणार असल्याने तीन राशींचं भलं होणार आहे. शुक्र, गुरु आणि सूर्यामुळे हे योग जुळून येणार आहेत.

500 वर्षानंतर या तीन राशींच्या नशिबात येणार राजयोग, ग्रहमंडळातील स्थिती ठरणार लाभदायी
500 वर्षानंतर या तीन राशींच्या नशिबात येणार राजयोग, ग्रहमंडळातील स्थिती ठरणार लाभदायीImage Credit source: File Photo
| Updated on: Jul 21, 2025 | 5:14 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती बदलली की काही योग जुळून येतात. काही योग शुभ, तर काही योग अशुभ मानले जातात. तर काही ग्रहांभोवती एक वलय असतं. त्या ग्रहांची स्थिती चांगली असली की त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. शुक्र ग्रह हा भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. यामुळे सांसारिक सुख, वैभव, धन, संगीत कला यासारख्या गोष्टी वाढण्यास आणि मिळण्यास मदत होते. गुरु ग्रह हा समृद्धी, अध्यात्म आणि यशाचा कारक आहे. तर सूर्य देव समाजातील मान सन्मान, सरकारी नोकरी, प्रशासकीय सेवा, वडील आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. या तीन ग्रहांच्या स्थितीमुळे नोव्हेंबर महिन्यात तीन राजयोग जुळून येणार आहे. यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. नोव्हेंबर महिन्यात हंस, मालव्य आणि बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. या योगामुळे कोणत्या राशींचं नशिब चमकणार ते जाणून घेऊयात.

मकर : या राशीच्या जातकांना करिअर आणि उद्योगधंद्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील. कारण शुक्र ग्रह या राशीच्या कर्म स्थानात उच्च स्थानी विराजमान असतील. त्यामुळे सप्तम भावात हंस राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना नवी उंची गाठता येणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. तसेच प्रमोशन आणि पदोन्नतीचा योग जुळून येऊ शकतो. व्यवसायिकांना या कालावधीत धनलाभ होऊ शकतो.

कुंभ : या राशीच्या जातकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. पण मालव्य, बुधादित्य आणि हंस राजयोगामुळे चांगले दिवस येतील. कारण मालव्य राजयोग नवव्या, हंस राजयोग सहाव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे नशिबाची साथ मिळेल. या कालावधीत अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. धार्मिक कार्य हातून पार पडतील.

कर्क : या राशीच्या जातकांच्या हंस राजयोग हा लग्न स्थानात तयार होत आहे. तसेच चतुर्थ स्थानात मालव्य राजयोग होत आहे. यामुळे जातकाच्या आत्मविश्वासात वाढ होईल. इतकंच काय तर आपल्या छबीचा समोरच्यावर योग्य तो परिणाम दिसून येईल. या कालावधीत भौतिक गरजा पूर्ण होताना दिसतील. कर्जबाजारी असलेल्या लोकांच्या डोक्यावरील भार कमी होईल. आई वडील आणि सासरच्या मंडळीसोबत संबंध दृढ होतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.