AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pirtu Paksha : आज मघा श्राद्ध, जाणून घ्या तिथीचे महत्त्व आणि श्राद्ध विधी

Pitru Paksha मघा श्राद्धासह पितृ पक्ष श्राद्धाचे महत्त्व मत्स्य पुराणात सांगितले आहे. पितृ पक्षातील मघा श्राद्ध हा शुभ दिवस आहे. हा एक विशेष दिवस आहे जेव्हा मघा नक्षत्र बलवान असते, यामागचे कारण म्हणजे मघा नक्षत्रावर पितरांचा प्रभाव असतो.

Pirtu Paksha : आज मघा श्राद्ध, जाणून घ्या तिथीचे महत्त्व आणि श्राद्ध विधी
पितृपक्षImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 10, 2023 | 8:46 AM
Share

मुंबई : पितृ पक्षातील मघा श्राद्ध आज आहे. पितृ पक्षातील (Pitru Paksha) मघा श्राद्ध हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात मघा नक्षत्र हे दहावे नक्षत्र आहे. हे श्राद्ध पितरांच्या सन्मानार्थ केले जाते. हे श्राद्ध इंदिरा एकादशीच्या दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. केतू हा मघा नक्षत्राचा स्वामी आहे. मघा श्राद्धात पितरांच्या शांतीसाठी विधी कसे केले जातात आणि तर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.

मघा श्राद्धाचे महत्त्व

मघा श्राद्धासह पितृ पक्ष श्राद्धाचे महत्त्व मत्स्य पुराणात सांगितले आहे. पितृ पक्षातील मघा श्राद्ध हा शुभ दिवस आहे. हा एक विशेष दिवस आहे जेव्हा मघा नक्षत्र बलवान असते, यामागचे कारण म्हणजे मघा नक्षत्रावर पितरांचा प्रभाव असतो. या तिथीला तर्पण विधी केल्याने पितरांचे आत्मा प्रसन्न होतो आणि पुण्यही प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या पूजेमुळे पितरांना मुक्ती आणि शांती प्राप्त होते. तर्पण आणि पिंडदानाने तृप्त झाल्यानंतर पितरांकडून आशीर्वाद प्राप्त होतो.

मघा श्राद्धाची पद्धत

श्राद्धाच्या वेळी आपल्या पूर्वजांचे फोटो समोर ठेवा. त्यांना चंदनाची माळ अर्पण करून शुभ्र चंदनाचा तिलक लावावा. या दिवशी पितरांना खीर अर्पण करा. वेलची, केशर, साखर आणि मध एकत्र करून खीर बनवा आणि भाताचे तीन पिंडं बनवून आपल्या पूर्वजांना अर्पण करा. यानंतर पितरांच्या स्मरनार्थ गाईला नैवेद्याचे पान लावा. या दिवशी ब्राम्हणाला भोजनदान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

मघा श्राद्धाचा मुहूर्त

कुतुप मुहूर्त- सकाळी 11:45 ते दुपारी 12:32 पर्यंत रोहीण मुहूर्त- दुपारी १२:३२ ते १:१९ दुपारची वेळ – दुपारी 1:19 ते 3:39 पर्यंत

आगामी श्राद्ध तारखा

11 ऑक्टोबर 2023, बुधवार- द्वादशी श्राद्ध 12 ऑक्टोबर 2023, गुरुवार- त्रयोदशी श्राद्ध 13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार- चतुर्दशी श्राद्ध 14 ऑक्टोबर 2023, शनिवार- सर्व पितृ अमावस्या

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था