AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात चुकूनही करू नये या पाच गोष्टींचे दान, अन्यथा करावा लागेल पितृदोषाचा सामना

पितृपक्षात (Pitru Paskha 2023) दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला 100 पट पुण्य मिळते असे मानले जाते. तसेच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते. परंतु, पितृपक्षाच्या काळात दानधर्म करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात चुकूनही करू नये या पाच गोष्टींचे दान, अन्यथा करावा लागेल पितृदोषाचा सामना
पितृपक्षात दानाचे नियमImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 29, 2023 | 11:41 AM
Share

मुंबई : पितृ पक्षात दानाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात (Pitru Paskha 2023) दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला 100 पट पुण्य मिळते असे मानले जाते. तसेच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते. परंतु, पितृपक्षाच्या काळात दानधर्म करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जाणून घेऊया पितृ पक्षात  कोणत्या वस्तूंचे दान करू नये. या वस्तूंचे दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला पितृ दोषाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पितृपक्षात चुकूनही या 5 गोष्टींचे दान करू नका.

पितृ पक्षात तेल दान करू नये

पितृ पक्षात तेल दान करू नये. पितृपक्षात तेल दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात.  विशेषत: मोहरीचे तेल चुकूनही दान करू नये.

पितृ पक्षात जुने वस्त्र दान करू नये

पितृपक्षात वस्त्र दान करायचे असेल तर फक्त नवीन कपडे दान करा. तुमचे जुने आणि निरुपयोगी कपडे कोणालाही दान करू नका.तसेच बूट आणि चप्पल दान करू नका. कारण असे दान केल्याने व्यक्तीवर राहू दोष आणि पितृदोषाचा प्रभाव पडतो. त्यामुळे तुमची प्रगती खुंटू शकते.

पितृ पक्षाच्या काळात शिळे अन्न दान करू नये

पितृ पक्षात अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शास्त्रात असेही सांगितले आहे की अन्नदान करणे हे श्रेष्ठ दान आहे. पितृपक्षात अन्नदान करायचे असेल तर चांगले अन्नदान करा आणि शिळे अन्न कोणालाही देऊ नका. पितृपक्षात एखाद्याला चांगले आणि शुद्ध अन्न दिल्याने पूर्वज प्रसन्न होतात.

पितृपक्षात लोखंडी भांडी दान करू नयेत

पितृ पक्षाच्या काळात अनेकजण भांडी दान करतात, पण लक्षात ठेवा की लोखंडी भांडी दान करू नयेत. लोखंडाचे भांडे दान केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमच्यावर पितृदोषाचा आरोप होऊ शकतो. त्यामुळे फक्त स्टीलची भांडी दान करा.

पितृ पक्षाच्या काळात काळे वस्त्र दान करू नये

पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने काळ्या रंगाचे कपडे कोणालाही दान करू नयेत. पितृ पक्षामध्ये पांढर्‍या रंगाचे कपडे व्यक्तीला दान करावेत. पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!