AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha : पितृ पक्षातले अष्टमी श्राद्ध आज, पितरांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे करा विधी

अष्टमीच्या श्राद्धात आठ ब्राह्मणांना अन्नदान करण्याची पद्धत आहे. या दिवशी पिंडदान केल्यानंतर श्राद्ध करावे. यानंतर पंचबली अनुष्ठानाबरोबरच ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि कच्चे धान्य दान करावे. या दिवशी कुशाच्या आसनावर बसून आपल्या पित्यासाठी भगवान विष्णूच्या गोविंद रूपाची पूजा करावी

Pitru Paksha : पितृ पक्षातले अष्टमी श्राद्ध आज, पितरांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे करा विधी
पितृपक्षImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 06, 2023 | 9:08 AM
Share

मुंबई : पितृ पक्षात श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की या काळात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर उतरतात आणि आपल्या कुटुंबाला भेट देतात. पितृपक्षात (Pitru Paksha) श्राद्ध, पिंड दान आणि तर्पण योग्य रीतीने केले तर दिवंगत आत्म्यांना शांती मिळते आणि ते सुखी व समाधानी परततात. आज पितृ पक्षाची अष्टमी तिथी आहे, त्यामुळे आज अष्टमी श्राद्ध केले जाईल. अष्टमी श्राद्धात, अष्टमी तिथीला मृत कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध केले जाते. याला अष्टमी श्राद्ध म्हणतात.

अष्टमी श्राद्धाची पद्धत

अष्टमीच्या श्राद्धात आठ ब्राह्मणांना अन्नदान करण्याची पद्धत आहे. या दिवशी पिंडदान केल्यानंतर श्राद्ध करावे. यानंतर पंचबली अनुष्ठानाबरोबरच ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि कच्चे धान्य दान करावे. या दिवशी कुशाच्या आसनावर बसून आपल्या पित्यासाठी भगवान विष्णूच्या गोविंद रूपाची पूजा करावी आणि नंतर गीतेच्या आठव्या अध्यायाचे पठण करावे.

तसेच पितृ मंत्राचा जप करून क्षमा मागावी. तांदळाची खीर, पालकाची डाळभाजी, पुरी आणि मिठाई याबरोबरच लवंग, वेलची यांचा अष्टमीच्या श्राद्ध भोजनात निश्चितपणे समावेश करावा. त्यानंतर अष्टमी पितृ मंत्राचा जप करावा – ओम गोविंदाय नमः. श्रद्धेनुसार अष्टमीला श्राद्ध करणार्‍यावर पितरांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. श्राद्ध केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते.

अष्टमी श्राद्ध मुहूर्त

कुतुप मुहूर्त – सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत रोहीण मुहूर्त – दुपारी 12:33 ते 01:20 पर्यंत दुपारची वेळ – दुपारी 01:20 ते 03:41 पर्यंत

आगामी श्राद्ध तारखा

07 ऑक्टोबर 2023, शनिवार- नवमी श्राद्ध 08 ऑक्टोबर 2023, रविवार- दशमी श्राद्ध 09 ऑक्टोबर 2023, सोमवार- एकादशी श्राद्ध 10 ऑक्टोबर 2023, मंगळवार- माघ श्राद्ध 11 ऑक्टोबर 2023, बुधवार- द्वादशी श्राद्ध 12 ऑक्टोबर 2023, गुरुवार- त्रयोदशी श्राद्ध 13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार- चतुर्दशी श्राद्ध 14 ऑक्टोबर 2023, शनिवार- सर्व पितृ अमावस्या

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण