
प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कारण शास्त्रात प्रदोष व्रत या दिवसाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर या पवित्र दिवशी व्रत केल्यास तुम्हाला अक्षय फळ मिळते. तसेच भगवान शंकर आणि देवी पार्वती माता यांचे पूजन करण्यासाठी हा दिवस खास आहे. 2025 मध्ये आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करण्यात येणार आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येते – पहिले कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला आणि दुसरे शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला. 2025 मध्ये सप्टेंबरमध्ये येणारा प्रदोष व्रत म्हणजे शुक्र प्रदोष व्रत. सप्टेंबर महिन्यातील हे दुसरे प्रदोष व्रत असेल.
सप्टेंबर महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत देखील विशेष आहे कारण हा व्रत पितृपक्षात येतो. सप्टेंबरमध्ये दुसरा प्रदोष व्रत कधी येईल आणि पितृपक्षात त्याची पूजा पद्धत काय आहे ते जाणून घेऊयात.
अश्विन महिन्याची कृष्ण त्रयोदशी 2025 तारीख
त्रयोदशी तिथी प्रारंभ: 18 सप्टेंबर 2025, गुरुवार, रात्री 11:24
त्रयोदशी तिथी समाप्त: 19 सप्टेंबर 2025, शुक्रवार, रात्री 11:36 वा.
तर यंदा प्रदोष व्रत हे 19 सप्टेंबरला केले जाणार आहे. तर या दिवशी प्रदोष काळातील पूजेचा वेळ संध्याकाळी 6:21 ते 8:43 पर्यंत असेल. म्हणजेच एकूण कालावधी 2 तास 27 मिनिटे असेल.
पितृपक्षातील प्रदोष व्रत केल्याने भगवान शिव तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वजांच्या शांती आणि मोक्षासाठी हे विशेष फलदायी मानले जाते.
प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकर यांचा आशीर्वाद मिळतो. तसेच यावेळी हे व्रत शुक्रवारी आहे. असे मानले जाते की जर पती-पत्नी दोघेही या दिवशी एकत्र हे व्रत केले तर वैवाहिक जीवनात आनंद येतो. त्याच वेळी अविवाहित लोकांना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळू शकतो.
त्रयोदशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर उपवासाचे व्रत करा.
देवघर स्वच्छ करा.
शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे.
चंदनाचा लेप लावा आणि बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करा.
भगवान शिव आणि देवी पार्वती यांना पांढरी मिठाई आणि फळे अर्पण करा.
“ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करा.
प्रदोषची कथा वाचा.
शिव-पार्वतीची आरती करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)