डायनिंग टेबलवर ‘या’ वस्तू ठेवल्याने निर्माण होतील आर्थिक, आरोग्यासंबंधातीत समस्या

वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबल हे कुटुंबाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे, ज्याचा घराच्या समृद्धीवर आणि घरातील सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. जर याच टेबलावर तुम्ही काही वस्तु ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण डायनिंग टेबलावर कोणत्या वस्तू ठेवणे टाळले पाहिजे ते जाणून घेऊयात.

डायनिंग टेबलवर या वस्तू ठेवल्याने निर्माण होतील आर्थिक, आरोग्यासंबंधातीत समस्या
डायनिंग टेबल
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 21, 2026 | 2:44 PM

डायनिंग टेबल ही अशी जागा आहे जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र जेवायला बसतात. पण तुम्हाला माहित आहे की वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबलचा वापर फक्त जेवण्यासाठीच होत नाही? तर वास्तू तज्ञ डायनिंग टेबलच्या जागेला खूप विशेष आणि महत्त्वाचे मानतात. हे असे स्थान मानले जाते जिथे कुटुंबातील सदस्यांची ऊर्जा एकत्र येते. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते घरातील डायनिंग टेबलाचा व्यक्तीच्या जीवनावर, आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर खोलवर परिणाम होतो. तथापि असे मानले जाते की जेवणाच्या टेबलावर काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने घराची समृद्धी,आनंददायी वातावरण बिघडू शकते. जर तुम्हाला तुमच्या घरात धन आणि समृद्धीचा ओघ सुनिश्चित करायचा असेल तर तुमच्या जेवणाच्या टेबलावर या वस्तू ठेवणे टाळा. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणत्या वस्तू डायनिंग टेबलवर ठेवण टाळावे.

या वस्तू जेवणाच्या टेबलावर ठेवू नका

1. वास्तुशास्त्रानुसार जेवणाच्या टेबलावर औषधे ठेवणे अशुभ मानले जाते, म्हणून औषध कधीच टेबलावर ठेवू नयेत. असे मानले जाते की जेवणाच्या जागेजवळ औषधे ठेवल्याने आरोग्य सुधारत नाही, उलट नकारात्मक ऊर्जा वाढते.

2. जेवणाच्या टेबलावर तडकलेली किंवा अर्धवट चिरलेली ताटं, कप किंवा चमचे ठेवू नका. जर तुमच्याकडे ती आधीच असतील तर ती ताबडतोब काढून टाका. वास्तूनुसार तुटलेली आणि तडकलेली भांडी घरात गरिबी आणतात. म्हणून नेहमी स्वच्छ आणि योग्य भांडीच वापरा.

3. तुमच्या जेवणाच्या टेबलाचा वापर ऑफिस डेस्क म्हणून करू नका. डायनिंग टेबलावर जुनी बिले, पावत्या किंवा वर्तमानपत्रे अस्ताव्यस्त ठेऊ नका. असे मानले जाते की यामुळे राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे आर्थिक ताण निर्माण होतो.

4. डायनिंग टेबलावर नेहमी ताजी फुले ठेवा. त्यावर कधीही सुकलेली फुले किंवा काटेरी वनस्पती ठेवू नका. काटेरी वनस्पती घरातील सकारात्मकता कमी करतात, ज्यामुळे संघर्ष आणि कलह होण्याची शक्यता वाढते.

5. वास्तुशास्त्रानुसार मीठ हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे डायनिंग टेबलावर कधीही मिठाची रिकामी डबी ठेवू नका. मिठाची डबी नेहमी भरलेली ठेवा. यामुळे घरात धन आणि समृद्धी येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us