कपाळावर चंदनाचा टिळा लावल्यामुळे नेमकं काय होते? जाणून घ्या प्रेमानंद महाजारांचे मत…
प्रेमानंद महाराजांच्या कपाळावर टिळा लावलेला तुम्ही नेहमीच पाहिले असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ते कपाळावर चंदनाचा टिळा का लावतात? नुकत्याच झालेल्या एका प्रवचनात स्वत: प्रेमानंद महाराजांनी याचे कारण स्पष्ट केले आहे.

पिवळे कपडे, कपाळावर चंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावर मोहक सौम्य. प्रेमानंदजी महाराज त्यांच्या रूपामुळे आणि ज्ञानामुळे लोकांच्या हृदयात रुजलेले आहेत. प्रेमानंद महाराज हे श्री राधा राणीच्या अनन्य भक्तांपैकी एक आहेत. महाराजजी आपल्या प्रवचनातून लोकांच्या मनातील द्विधा मनस्थिती दूर करतात आणि भक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. प्रेमानंदजी महाराजांना पाहून लोकांच्या मनात नेहमी असा प्रश्न येतो की, संपूर्ण कपाळावर चंदनाचा टिळा का लावतात? आता त्यांनी स्वत: यामागचे कारण सांगितले आहे. चंदनाचा टिळा लावण्याला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. चंदन हे शीतल, सुगंधी आणि पवित्र पदार्थ मानले जाते. देवपूजेमध्ये त्याचा वापर शुद्धता, भक्ती आणि सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी केला जातो.
कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत होते, विचार स्थिर होतात आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे ध्यान, जप किंवा अध्ययन करताना याचा विशेष उपयोग होतो. आयुर्वेदानुसार, चंदनाच्या थंड गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि मेंदूला थंडावा मिळतो. कपाळाच्या मध्यभागी (आज्ञा चक्रावर) टिळा लावल्याने स्नायूंना आराम मिळतो, डोकेदुखी कमी होते आणि तणाव दूर होतो. तसेच चंदनाचा सुवास मन प्रसन्न ठेवतो आणि नकारात्मक विचारांपासून संरक्षण करतो. धार्मिक दृष्टीने, चंदनाचा टिळा लावणे हे देवतांप्रती आदर, नम्रता आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.
कपाळावरील टिळा लावण्याचे महत्त्व अलीकडेच एका भक्ताने महाराजजींना विचारले की, टिळक लावणे हा दिखावा आहे की नाही, कपाळावर टिळा लावण्याचे काय महत्त्व आहे, कारण तुम्हीही संपूर्ण कपाळावर टिळा लावता. या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय सुंदर उत्तर दिले आणि सांगितले की, टिळक लावणे हा दिखावा नसून आपली पूजा, आपली ईश्वरभक्ती आहे. मंदिरात किंवा पूजा करताना टिळा लावल्याने देवकृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे चंदनाचा टिळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून आरोग्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा सुंदर संगम आहे.
प्रेमानंद महाराज टिळा का लावतात? प्रेमानंद महाराज म्हणाले, “आम्ही कपाळावर जो चंदनाचा टिळा लावला आहे तो दिखाव्यासाठी नाही, तर आचार्य परंपरेत कपाळावर टिळा लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. कपाळावरचा टिळा म्हणजे काही सजावटीची वस्तू नाही, तर राधाराणीला अर्पण केलेला प्रसाद आहे. कपाळावर टिळा लावणे हे भक्तीचे लक्षण आहे. https://www.instagram.com/reels/DQosEhtD0pq/
देवाशी असलेल्या संबंधांचे प्रतीक प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, आम्ही जी कंठी बांधली आहे ती आमच्या गुरूंनी दिली आहे, जी हार गुरुंनी दिली आहे आणि वस्त्रही आमच्या गुरूंनी दिले आहे. हे सर्व आपल्या उपासनेचे प्रतीक आहेत, दिखावा नाही. या सर्व गोष्टी आपल्या भक्तीची चिन्हे आहेत, ईश्वराशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहेत. महाराजजी म्हणाले, “जर आम्हाला असे वाटले की आम्ही टिळा किंवा कंठी घालू नये, जेणेकरून लोक आम्हाला दिखाऊ समजू नयेत, तर आमची पूजा अपूर्ण राहील आणि तो अपमान होईल.”
