Putrada Ekadashi 2021 : संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी अवश्य करावी, जाणून घ्या व्रत तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा

| Updated on: Aug 14, 2021 | 2:21 PM

सर्व एकादशीला शास्त्रात सर्वोत्तम उपवास मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. एक महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकादशी असते. सर्व एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक एकादशी मोक्षदयानी असण्याबरोबरच एक विशिष्ट इच्छा पूर्ण करण्याविषयी असते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते.

Putrada Ekadashi 2021 : संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी अवश्य करावी, जाणून घ्या व्रत तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा
Bhagvan Vishnu
Follow us on

मुंबई : सर्व एकादशीला शास्त्रात सर्वोत्तम उपवास मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. एक महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकादशी असते. सर्व एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक एकादशी मोक्षदयानी असण्याबरोबरच एक विशिष्ट इच्छा पूर्ण करण्याविषयी असते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते.

यावेळी, पुत्रदा एकादशी 2021 गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. नि:संतान लोकांसाठी आणि ज्यांना मुलगा हवा आहे त्यांच्यासाठी हा उपवास अत्यंत उत्तम मानला जातो. याला पवित्रा एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत व्यक्तीच्या आतील आत्म्याचे शुद्धीकरण करते आणि व्यक्तीने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते. पुत्रदा एकादशीच्या व्रताचा शुभ मुहूर्त, उपासना पद्धत, महत्त्व आणि कथा जाणून घ्या.

शुभ मुहूर्त

✳️ एकादशीची तिथी प्रारंभ – 18 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 03:20 वाजता

✳️ एकादशीची तिथी समाप्त – 19 ऑगस्ट 2021 सकाळी 01:05 वाजता

✳️ पारण मुहूर्त – 19 ऑगस्ट रोजी सकाळी 06:32 ते 08:29

पूजेची पद्धत काय?

दशमीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करु नये आणि भगवान विष्णूचे ध्यान केल्यानंतर झोपा. सकाळी उठून अंघोळीच्या वेळी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घालून पूजा करावी. सर्वप्रथम भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि हातात फुले, अक्षता आणि दक्षिणा घ्या आणि मुठी बंद करा आणि व्रताचा संकल्प करा. यानंतर ते फुले प्रभूच्या चरणी सोडा.

आता लाल कपड्यात एक कलश बांधा नंतर त्याची पूजा करा आणि देवाच्या मूर्तीला या कलशाच्या वर ठेवा. मूर्तीला पाणी वगैरे अर्पण केल्यानंतर नवीन कपडे घाला. नंतर धूप, दिवा, फुले वगैरे अर्पण करुन नैवेद्य दाखवा. त्यानंतर एकादशीची कथेचं पठण करा. पूजा केल्यानंतर, प्रसाद वाटप करा आणि ब्राह्मणाला दक्षिणा दान करा. दिवसभर उपवास ठेवा. जर ते शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी फळ घेऊ शकता. एकादशीच्या रात्री जागरण करा आणि देवाचे भजन करत राहा. दुसऱ्या दिवशी, ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा देऊन सन्मानपूर्वक निरोप दिल्यानंतरच आपला उपवास सोडा.

या एकादशीची व्रत कथा काय?

प्राचीन काळी महिष्मती नावाच्या एका नगरात महिजित नावाच्या एका धर्मात्मा राजाने आनंदाने राज्य केले. तो राजा अत्यंत शांतीप्रिय, ज्ञानी आणि दानशूर होता. त्या राजाला मुलंबाळ नव्हते, यामुळे तो बऱ्याचदा दु:खी राहायचा. एके दिवशी राजाने आपल्या राज्यातील सर्व ऋषी-मुनी, संन्यासी आणि विद्वानांना बोलावले आणि संतान प्राप्तीचा मार्ग विचारला. तेव्हा एका ऋषींनी सांगितले की, “राजन! पूर्वीच्या जन्मात, श्रावण महिन्याच्या एकादशीच्या दिवशी एक गाय तुझ्या तलावाचे पाणी पीत होती. तुम्ही त्या गायीला तेथून हाकलून लावले. तेव्हा संतापलेल्या त्या गायीने तुम्हाला संतानहीन होण्याचा शाप दिला. यामुळे तुम्हाला आजपर्यंत मुले झालेली नाहीत.”

“जर तुम्ही पत्नीसह पुत्रदा एकादशीला भगवान जनार्दनाची भक्तिभावाने पूजा केली आणि व्रत केले तर या शापाचा प्रभाव दूर होईल.” ऋषींच्या आदेशानुसार राजाने तेच केले. त्यांनी पत्नीसह पुत्रदा एकादशीचा उपवास केला. या उपवासाच्या परिणामामुळे, राणी काही काळातच गर्भवती झाली आणि तिने एका सुंदर आणि तेजस्वी बाळाला जन्म दिला.

पुत्राच्या जन्मामुळे राजा खूप प्रसन्न झाला आणि तो कायम एकादशीचे उपवास करु लागला. असे म्हटले जाते की जो नि:संतान आहे, जर त्या व्यक्तीने हे व्रत शुद्ध अंतःकरणाने पूर्ण केले तर निश्चितपणे त्याची इच्छा पूर्ण होईल आणि त्याला संतान प्राप्ती होईल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

तुळशीशिवाय अपूर्ण असते भगवान विष्णूची पूजा; जाणून घ्या तुळशीच्या रोपामुळे घरात सुख कसे नांदते?

Shani Dev | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी या 3 जणांची सेवा करा